उद्धुमातक म्हणजे सुजून फुगलेले प्रेत.  विनीलय म्हणजे नीळे झालेले प्रत.  विपुब्बक म्हणजे ज्यांत पू उत्पन्न झाला आहे असे प्रेत विच्छिद्दक म्हणजे छिद्रे पडलेले प्रेत.  विक्खायितक म्हणजे निरनिराळ्या प्राण्यांनी अर्धवट खाल्लेले प्रेत.  विक्खित्तक म्हणजे ज्याचे अवयव अस्ताव्यस्त पडले आहेत असे प्रेत.  हतविक्खित्तक म्हणजे भिन्न भिन्न प्राण्यानी किंवा शस्त्रांनी कापून ज्याचे अवयव इतस्ततः पसरले आहत असे प्रेत.  लोहितक म्हणजे ज्यांतून रक्त स्त्रवत आहे असे प्रेत.  पुळवक म्हणजे कोडे पडलेले प्रेत.  अट्ठिक म्हणजे हाडांचा सांगाडा किंवा त्याचा कोणताही भाग.  याप्रमाणे ही दहा अशुभे म्हणजे दुसरे काही नसून मृतशरीराच्या भिन्न भिन्न अवस्था आहेत.  त्यांच्यावर ध्यान करणे याला अशुभभावना म्हणतात.  अशा शरीरापैकी एखादे शरीर दिसले असता ते नीट पाहून घेऊन व पुढे तोच देखावा डोळ्यासमोर ठेऊन चिंतन केले असता हे ध्यान साध्य होते.  स्त्रीला पुरुषांचे आणि स्त्रीचे मृत शरीर पाहून ध्यान साध्य होणे शक्य नाही.  म्हणून असे शरीर वर्ज करावे.  सजातीय प्रेतावर ध्यान करीत असता जर ते डोळ्यासमोर येत नसले, तर त्याच्या जो भाग विशद्धपणे डोळ्यांसमोर येईल त्यावरच ध्यान करून ही समाधि साधावी.

कायगतास्मृतीने जसे पहिलेच ध्यान साध्य होते तसे ते अशुभांच्यायोगानेही होते.  काकी अशुभांलाहि अशुभवितर्काची आवश्यकता असल्यामुळे त्यांची गति पहिल्या ध्यानापलीकडे जात नाही.  कायगतास्मृति आणि अशुभ यात एवढाच फरक आहे की, पहिल्याचे आलंबन जीवंत स्वशरीर असते, व दुसर्‍याचे मृत परशरीर असते.  विशुद्धिमार्गात कायगतास्मृतीचा विभाग भिन्न आहे, आणि अशुभाचा विभाग भिन्न आहे.  तरी त्यांच्यात फार साम्य असल्याकारणाने ती येथे या एकाच प्रकरणात दाखल केली आहेत.
-----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------
समाप्त
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to समाधिमार्ग