देहूचे भाग्य कोणी वर्णावे ! तेथील अणुरेणूंतूनसुध्दा “विठ्ठल विठ्ठल” आवाज येत असेल:

देहूचा अणुरेणू             गर्जे विठ्ठल विठ्ठल
लोकां उध्दरील                 क्षणामाजी

आणि कोकणातील परशुरामाचे देवस्थान् तेथील ती पाखाडी. ती चढायला कठीण असलेली चढण. आई मुलाला म्हणते:

भार्गवराम देवाजीची         पायठणी अवघड
येथून पायां पड                 गोपू बाळा

त्या देवळाला चुना किती लागला, उत्सवात जेवणाचे वेळेस सार करताना चिंच किती लागते, याची गमतीदान वर्णने आहेत :

तिन्ही देवांमध्ये         भार्गवराम उंच
सव्वा खंडी चिंच             उत्सवाला
तिन्ही देवांमध्ये         भार्गवराम जुना
सव्वा खंडी चुना             देवळाला

असा हा भार्गवराम; त्याच्या पूजेला रोज कस्तुरी. आणि एक सखी म्हणते:

कस्तुरीचा वास             माझ्या ओच्याला कुठूनी
आल्ये सख्याला भेटूनी             भार्गवरामा

आणि हिंदुस्थानच्या दक्षिणेकडचा तो रामेश्वर- त्याचे एका ओवीतील वर्णन वाचा:

देवांमध्ये देव             रामेश्वर अति काळा
त्याच्या दोंदावर             रुद्राक्षांच्या रुळती माळा

चिंचवड, नरसोबाची वाडी, खंडोबा यांचीही वर्णने आहेत;

खोबर्‍याच्या वाटया         हळदी भरल्या
देव भंडारा खेळला             जेजूरीचा

कोकणातील राजापूरच्या गंगेचेही वर्णन करणार्‍या किती तरी ओव्या आहेत:

गंगाबाई आली             तळकातळ फोडून
राजापुराला वेढून             वस्ती झाली

आणि प्रसिध्द मुंबापुरी ! तेथील ती मुंबादेवी:

मुंबईची मुंबादेवी         तिची सोन्याची पायरी
सव्वा लक्ष तारूं             उभें कोटाच्या बाहेरी

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्त्रीजीवन


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
सापळा
पैलतीराच्या गोष्टी
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा