नवर्‍या मुलीला दागदागिन्यांनी नटवतात. जणू लहानशी बाहुली :

नाकी मोंठी नथ         तोंडा पडली साउली
चित्रशाळेची बाहुली             उषाताई ॥

लहानग्या मुलीचे ते लहानसे नाक, परंतु त्यात मोठी नथ घालतात, सारे तोंड झाकून जाते. कोवळे नाक दुखते :

करवंदी मोत्यांची         नथ लाखाच्या मोलाची
आहे कोवळया नाकाची             उषाताई ॥

काही काही वर्णने काव्यमय आहेत :

पिवळी नागीण             चंदनवेलीला
तसा पट्टा कमरेला             उषाताईच्या ॥
दागिन्यांनी वाके         जशी लवली ग केळ
नाजूक फूलवेल                 उषाताई ॥

पंक्तीत नवरी नवर्‍याच्या पानात बसते. एकमेकांस घास देतात, जणू पहिली तोंडओळख. ओखाणा घेऊन घास देतात. ते वर्णन पहा कसे गोड आहे :

घेऊन ओखाणा             नवरी घांस देई
हळूच वर बघे                 पुन्हा मान खाली होई ॥

नंतर वरात निघते :

झोपाळयांच्या वरातीला         मोत्यांचे घोस लावूं
प्रेमाचे गीत गाऊं             उषाताईला ॥

वरात येते. नवीन नाव ठेवले जाते. माहेर तुटले, सासर जोडले :

माउलीच्या डोळां         घळकन पाणी आले
नांव बदलीलें                 सासर जोडीलें
नांव नवीन ठेवलें                 उषाताईला ॥

आता सासरी जायचे. केवढा करुण प्रसंग. या सर्व ओव्या कारुण्याने थबथबलेल्या आहेत. वाचताना डोळे डबडबतात :

काळी कपिला गाय         अपुल्या कळपाला चुकली
मला मायेने टाकीली             परदारी ॥
नऊ मास होत्यें         मायबायेच्या उदरी
आता मी परघरी             लोक झाल्यें ॥

या ओव्या हृदयाला घरे पाडतात, डोळयाला झरे फोडतात, भाऊ समजावतो, बहिणीच्या पदरी पेढे बांधतो. बाप म्हणतो, शहाणी आहेस, रडू नकोस. आईला राहवत नाही :

सासर्‍या जातांना         माय धरीते पोटाशी
तान्ह्ये कधी ग भेटशी             उषाताई ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्त्रीजीवन


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
सापळा
पैलतीराच्या गोष्टी
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा