रसपरिचय

तान्ह्या बाळांच्यासंबंधीच्या शेकडो ओव्या आहेत. या ओव्यांतून अपार वत्सलता आहे. या ओव्यांतील काव्यशक्ती उच्च दर्जाची आहे. काही काही ओव्या वाचून व्यास-वाल्मीकी, कालिदास-भवभूती यांनीही माना डोलवाव्या. या प्रकरणात मुलगा अगदी लहान आहे तोपासून तो शाळेत जाऊ लागतो, त्याची मुंज वगैरे होते, तो पर्यन्तच्या ओव्या दिल्या आहेत. शक्य तो ओव्यांत क्रम आणण्याची खटपट केली आहे. परंतु अनेक ओव्या पुढेमागेही झाल्या आहेत. सर्व ओव्यांचा क्रम सांभाळणे कठीण असते. कारण या ओव्या स्फुट आहेत. अनेक ठिकाणी एकेक गोळा केलेल्या आहेत. स्त्रियांनीही निरनिराळया प्रसंगी निरनिराळया स्थळी, काळी त्या रचलेल्या आहेत. रचलेल्या म्हणण्यापेक्षा त्यांच्या तोंडून सहज हे मंगल बालवेद, या मधुर श्रुती बाहेर पडल्या. खरोखरच या ओव्यांत मला एक प्रकारची दिव्यता दिसून येते. त्यांतील माधुर्याला तर सीमाच नाही. या मजबरोबर. मी दाखवतो त्यांतील रमणीयता, चाखवतो मधुरता.

तान्हे बाळ जन्माला येणे म्हणजे केवढी मंगल गोष्ट. ईश्वराला मानव जातीची आशा आहे याची ती खूण. संसाराला सुंदरता देणारी, कोमलता देणारी ती वस्तू. माता म्हणते :

माझे तान्हे बाळ        देवाचे मंगल
अमृताचें फळ            संसाराचे ॥
तान्हिया रे बाळ        मंगलाच्या मूर्ति
संसाराची पूर्ती            तुझ्यामुळें ॥
तान्हें हे जन्मले        भाग्य ग उदेलें
आनंदी बुडालें            सारे जग


मातेलाच तान्ह्या बाळाच्या जन्माचा आनंद होतो असे नाही, तर सर्व जगाला त्याचा आनंद आहे. तान्हे बाळ जन्माला आले. पाळणा बांधला. माहेराहून मामा पाळणा पाठवतो :

पालख पाळणा        मोत्यांनी विणीला
मामाने धाडिला            तान्हें बाळा ॥

या पाळण्याला माउली नटवते. त्याच्यावर खेळणी बांधते. पाळण्यात तिचे रत्‍न
असते :

पाळण्याच्या वरी        विचित्र पांखरूं
नक्षत्र लेंकरूं            तान्हें बाळ ॥
पाळण्याच्या वरी        खेळणे कागदाचें
गोड रूप तान्हेयाचें        राजसाचें ॥

पाळण्यातील गोड नक्षत्रासारख्या मुलाला पाहून सर्वांना मोह पडतो. येणारा जाणारा पाळण्यात डोकावतो व झोका देतो.

रंगीत पाळणा        बांधला बहाली
येता जाता मुली            हालवीती ॥

त्या पाळण्याचे मातेला कौतुक वाटते. तो पाळणा तिच्या मुलाला वाढवीत असतो. त्या पाळण्याच्या त्या दोर्‍या तिला मोत्यांचे सर वाटतात.

पाळण्याचे दोर            जसे मोतियांचे सर
शोभिवंत घर                पाळण्यानें ॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to स्त्रीजीवन


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
अजरामर कथा
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
सापळा
पैलतीराच्या गोष्टी
खुनाची वेळ
गांवाकडच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
लोकभ्रमाच्या दंतकथा