अमोल ला खूप लागलं होतं .समीर आणि निलेश नी अमोलला उचलून बाहेर आणलं .ते दोघेही अमोलला अश्या अवस्थेत बघून घाबरून जातात. ते अमोलला घेऊन निर्मला आजीच्या खोलीत आणतात. समीर आजीला हाक मारतो .आजी तिथे येतात अमोलला बघून त्यांना ही वाईट वाटत . त्या त्यांच्या शक्तीने अमोलला शुद्धीवर आणतात आणि त्याच्या वेदना कमी करतात. ते बघून समीर आणि निलेश च्या जीवात जीव येतो.अभय आणि जनाकाका टेकडीवर पोहचले की नाही ती पण काळजी असतेच. अमोलचीअशी  अवस्था बघून समीरला रडायला येतं..

" आजी मी ही रुद्राक्षाची माळ काढून टाकतो.माझ्यामुळे अम्या ला ते दोघं इजा पोहचवत आहेत . त्याला का म्हणून ही शिक्षा? आजी माझं वाटेल ते करू दे त्यांना .पण माझ्यामुळे अम्या च्या जीवाला मी नाही हानी होऊ देणार" समीर भावनिक होऊन बोलतो आणि ती माळ काढणार च " समीर

" स ..स.. सम्या थांब काढू नको माळ तुला माझी शपथ आहे"  अमोल त्याच्या वेदनेनी भरलेल्या आवजात समीर ला माळ काढण्यापासून थांबवतो..समीर अमोल जवळ जातो..

" अम्या तुझ्या जीवापेक्षा काही मोठं नाही रे. तुला काही झालं तर मी स्वतः ला कधीच माफ करू शकणार नाही. मला जाऊ दे त्या सैतांनासमोर माझं वाटेल ते झालं  तरी चालते..पण तुला काही व्हायला नको" समीर च्या डोळ्यात अश्रू येतात..

" काय सम्या तू अरे जिगरी मित्र आहोत आपण ते उगाच नावाला का. एकमेकांसाठी जीव ही देऊ अशी मैत्री आहे आपली आणि मला काहीही होणार नाही नको काळजी करू .पण तू असा वेडेपणा नको करू .तुला सगळं खूप धीराने घ्यायच आहे .तूच जर असा बिथरला तर  त्या दृष्ट आत्म्यांचा अंत कसा करशील?? आजीला न्याय कसा मिळवून देशील? म्हणून संयम ठेवून वाग" अमोल समीरला समजावून सांगतो

" अमोल म्हणतो आहे ते अगदी बरोबर आहे सम्या काहीही झालं तरी तुला धीराने पुढे जावं लागणार आहे. खूप मोठया चक्रव्यूहात अडकलो आहे आपण यातून तुलाच सगळ्यांना बाहेर काढायचं आहे. आम्ही आहोत तुझ्यासोबत  आमच्या जीवाची नको पर्वा करुस. आपण कोणाच वाईट केलं नाही तर देव आपल्या सोबत वाईट होऊ देणार नाही. परमेश्वर आहे आपल्या सोबत" निलेश

आपल्या मित्रांच धीर देणार बोलणं ऐकून आणि त्यांची मैत्री, प्रेम बघून समीरच्या डोळ्यांत पाणी येतो आणि तो रडायला लागतो.अमोल आणि निलेशच्या ही डोळ्यांत पाणी येत एकमेकांना मिठी मारून त्यांची असणारी घनिष्ठ मैत्री अनुभवतात. त्या तिघांकडे बघून आजीच्या डोळ्यात पाणी येत.

" समीर खरच नशीबवान आहेस तू. इतके प्रेम करणारे मित्र तुला मिळाले. आपल्या जीवाची पर्वा न करता  हे तिघेही तुझ्यासाठी धडपडत आहेत .आता तुझी जबाबदारी आहे यांना यातून सुखरूप बाहेर काढणं. मी तुला आधीच म्हणलं होत की हे दोन दिवस कठीण आहेत त्या कठीण काळात तू कसा  वागतो यावर पुढच अवलंबून आहे. मला माहित आहे तुला अमोलची खूप काळजी वाटते म्हणून तू अस वागतो आहेस पण समीर अमोलला काहीही होणार नाही याची खात्री बाळग .पण..." आजी बोलता बोलता मधेच थांबते..

" पण ?? काय आजी?? समीर आजीला  विचारतो

" उद्यापर्यंत काहीही करून तुला ती वस्तू शोधून नष्ट करावी लागेल, नाहीतर अमावस्या लागली की ती शक्ती अधिक प्रभावशाली होईल आणि अमोलच्या शरीरावर कायमचा   ताबा मिळवून पाटील घरण्यालाच नाही तर सम्पूर्ण गावाला संपवून टाकेल" ..आजी

" नाही आजी अस नाही होऊ देणार . मी वस्तू शोधून काढलेच .." समीर आत्मविश्वासाने बोलतो..

बघता बघता रात्र होते .अमोलला निर्मला आजीच्या खोलीत झोपवून समीर अन निलेश  खाण्याचं काही बनवण्यासाठी स्वयंपाक घरात येतात.. अन अचानक लाईट जाते .सगळीकडे काळोख पसरतो .दोघांच्या मनात धस्स होत.


मोबाईल चा टॉर्च लावून हळूहळू स्वयंपाक घरात पोहचतात.समीर शेगडी पेटवतो। तस खाडकन मागचं दार उघडल्या जात .अचानकपणे वादळ सुटतं ,विजांचा कडकडाट आणि जोऱ्याचा पाऊस पडायला लागतो.अशा वातावरणात वाडा खूप भयंकर वाटायला लागतो. अंधार झाल्याने अमोल ही खोलीच्या बाहेर येतो . तो बाहेर आल्याबरोबर संग्राम त्याच्या शरीरात प्रवेश करतो.अमोलचे डोळे लालबुंद होतात. चेहऱ्यावर असुरी हास्य.कालिंदीचा आत्मा ही तिथे येतो.अमोल च्या शरीरातील संग्राम स्वयंपाक खोली पर्यंत जातो.
त्याला बघून समीर अन निलेश दचकतात ...

"अम्या अरे बाहेर कशाला आलास,  त्या दृष्ट आत्मा आहेत न अवती भवती" निलेश

" अरे काही नाही होत ...आत किती अंधार आहे मला भीती वाटली म्हणून बाहेर आलो" अमोल स्पष्टीकरण देतो..

अमोलच बोलणं ,त्याचे डोळे यात फरक पडला होता. पण तसं त्याने समीर आणि निलेश ला जाणवू दिलं नाही.. त्या अंधारात च कसबस खाण्याचं बनवून त्यांनी जेवण करून घेतलं आणि झोपायला म्हणून खोलीत गेले.झोप तर लागणार नव्हती. वातावरण ही भयंकर झालेलं असते. समीर ला सारखा विचार येत असतो की अभय टेकडीवर पोहचला असेल की नाही?? आणि स्वामींच्या शिष्याला आणू शकेल की नाही?? कारण आता फक्त उद्याचा एक दिवस उरलेला असतो जो अंतिम आणि निर्णायक ठरणार असतो...उद्या ठरणार असते की  अनेक वर्षांपासून वाड्याला श्राप ठरलेल्या त्या दोन दृष्ट शक्तींचा अंत होणार की समीर आणि त्याच्या मित्रांचा घात होणार?  थकल्यामुळे समीर अन निलेशला झोप लागते.अमोल कधीचा झोपलेला असतो.


......................................................

अभय आणि जनाकाका आश्रमात थांबण्याची स्वामींच्या शिष्यांना विनंती  करतात.विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांना तिथे राहण्याची परवानगी मिळते..त्यांच्या जेवणाची आणि राहण्याची व्यवस्था केली जाते.स्वामींचे शिष्य जनाकाकांना औषध ही देतात ज्यामुळे त्यांना बर वाटायला लागतं .अशक्तपणा मुळे त्यांना लगेच झोप लागते.अभय मात्र अस्वस्थ असतो म्हणून तो आश्रमातील महादेवाच्या मंदिरात जातो...

" देवा तुला तर सगळंच माहिती आहे. माझे मित्र खूप मोठया संकटात सापडले आहेत.त्यांना यातून बाहेर  काढायला  स्वामींच्या मदतीची गरज आहे. त्यांना लवकरात लवकर आमच्या मदतीला पाठव .फक्त उद्याचा वेळ आहे माझ्याकडे नाहीतर घात होईल. या संकटातून तूच वाचवू शकतोस देवा.माझ्या मित्रांच रक्षण कर" अभय हात जोडून महादेवाला प्रार्थना करत असतो ..


.............................................................

सगळे झोपल्यावर अमोल उठतो समीर अन निलेश झोपल्याची खात्री करून तो हळूच खोलीच्या बाहेर पडतो..तो अमोल नसतो अमोलच्या शरीरातील संग्राम असतो. संग्राम त्याच्या वरच्या खोलीत जातो .कालिंदीचा आत्मा ही तिथे येतो..


" मालक बस एकच दिवस राहिला आता,उद्या रात्री आपण लई शक्तीशाली बनू .मंग कोणीबी आपलं काय बिघडवू शकणार नाय. तुम्ही या पोराच्या शरीरात तुमचा ताबा नेहमीसाठी मिळवू शकता. साऱ्याइले संपवू आपण" अस बोलून कालिंदी जोऱ्याने हसायला लागते..

संग्राम पेटी उघडून कालिंदीचा आत्मा कैद असलेली काळ्या रंगाची मोठी बाहुली बाहेर काढतो. आणि आत असलेल्या चाकूने  आपलं बोट कापून रक्ताचं रिंगण तयार करतो.त्या रिंगणात ती बाहुली ठेवून मंत्र म्हणायला लागतो.हे मंत्र कालिंदीची ताकद वाढवत असतात.समीर ला जाग येते तो उठून बघतो तर अमोल जागेवर नसतो.

" निल्या ..उठ अरे अम्या बघ कुठे गेला" समीर निलेशला उठवतो..


दोघेही अमोलला शोधायला बाहेर पडतात ..

" अम्या,कुठे आहेस तू" निलेश अमोलला हाक मारतो..


   त्याची हाक ऐकून संग्राम सावध होतो.त्याचे मंत्र थांबवुन ती बाहुली  पेटित ठेवून .खोलीच्या बाहेर येतो.समीर निलेश वर येतात तेव्हा अमोल खाली पडलेला दिसतो .त्याला उचलून ते खाली आणतात. त्याच्या हाताला लागलेलं असते.

" अम्या उठ काय झालं तुला?" समीर अमोलला उठवायचा प्रयत्न करतो..

अमोल शुद्धीवर येतो..

" अम्या अरे तू वरच्या मजल्यावर कशाला गेला होतास ,हे बघ तुझं बोट कापलं आहे,जखम झाली आहे" निलेश

" मला नाही माहीत मी कसा वर गेलो "  अमोल बुचळ्यात पडतो..

हे सगळं त्या दृष्ट संग्राम आणि कालिंदिने केलं असावं हे त्यांच्या लक्षात येतं.. तितक्यात कालिंदीचा आत्मा तिथे येतो.आणि ती क्रूरपणे  हसायला लागते..

" नाय वाचणार तुम्ही ,सारे मरतील ..नाही जित ठेवणार तुम्हांसनी..आजची रात हाय तुमच्याकड उद्या एक एक करून मरणार" कालिंदी.

तिची बोलणं ऐकून समीर चिडतो

" अस काहीच होणार नाही.. अंत तुमचा होणार आहे आता..खूप छळलं तुम्ही या वाडयातील लोकांना. तुमचा अंत  जवळ आला.तुम्ही तयार रहा " समीर

" तुला काय वाटत आम्हाला मारणं इतकं सहज आहे,मग मूर्ख आहेस तू. भलत्या भ्रमात नको राहू. उद्या अमावस्या आहे तुझी ही माळ  काहीच करू शकणार नाही आमच्या शक्तीपूढे. तुझा तो मित्र तर पळाला सोडून तुला .उद्या हे सुध्दा जातील पण वाड्याच्या बाहेर नाही , सरळ वर जातील आणि तुही त्यांच्या सोबत जाशील. माझा बदला पूर्ण होणार तुम्ही"  अमोलच्या शरीरातील संग्राम बोलतो..

चेतावनी देऊन संग्राम आणि कालिंदीचा आत्मा अदृश्य होतो..आता उद्या काय करायचं या विवंचनेत समीर आणि त्याच्या मित्राची रात्र जाते..सकाळ होते .समीर अभयची वाट पाहत असतो..

.........................................................

मार्तंड स्वामी अजूनही आलेले नसतात .समीर खूप काळजीत असतो काय करावं त्याला कळतं नसते. अमावस्या दुपार पासून सुरू होते तस तशी त्या दृष्ट शक्तीची ताकद वाढते.अमोल चा ताबा संग्रामने घेतला असतो. निर्मला आजी समीर ला लवकरात लवकर ती वस्तू शोधायला सांगतात .समीर संग्रामच्या खोलीत तर प्रवेश करतो पण त्याला ती पेटी काही केल्या उघडत नाही. संग्रामने आपल्या काळ्या जादूच्या मंत्राने ती पेटी बंद करून ठेवली असते.समीर हताशपणे खाली येतो..अमोलची अवस्था तर खूप वाईट असते .हळूहळू दुपारची संध्याकाळ होते.संग्राम आणि कालिंदी समीर समोर उभे ठाकतात .त्यांची ताकद प्रचंड वाढलेली असते त्यांच्या पुढे निर्मला आजीचा आत्माही काहीही करू शकत नाही.  रुद्राक्षाच्या माळी चा ही प्रभाव त्यांच्या समोर टिकत नाही. संग्राम समीरच्या अंगावर धावून जातो तसा निलेश मध्ये येतो संग्राम एक झटक्यात त्याला उचलून फेकतो. निलेश खूप जोऱ्याने कोसळतो. समीर पुन्हा धावत वरच्या खोलीत जातो ती पेटी उघडण्याचा प्रयत्न करतो पण काही केल्या ती पेटी उघडत नाही. कालिंदीचा आत्मा समीरला फरफटत खाली घेऊन जातो.अमोलच्या शरीरात असणारा संग्राम समीर ला केस धरून भिंतीवर आपटतो .कालिंदी तिच्या विषारी नखांनी त्याला ओरबाडत असते.निर्मला आजी आपली शक्ती लावून तिला समीर पासून दूर करण्याचा प्रयत्न करत असते.समीर खूप जखमी झालेला असतो. संग्राम एक धार धार शस्त्र घेऊन समीर जवळ येतो तो ते शस्त्र समीरच्या पोटात खुपसणारच की तेवढ्यात संग्राम जोऱ्याने किंचाळतो. कारण स्वामी मार्तंड नी वाड्यात प्रवेश केलेला असतो. मृत्यूनंजय मंत्राचा उच्चार करत आणि भंडाऱ्याची उधळण करत ते आत येतात.त्या पवित्र भंडाऱ्या चा स्पर्श होताच संग्राम किंचाळतो आणि अदृश्य होतो..अभय अन जनाकाका समीर,अमोल अन निलेश ला उचलतात.समीर स्वामींकडे बघतो.स्वामी वयाने वृद्ध होते तरी त्यांच्या चेहऱ्यावर प्रचंड तेज होत.ते आल्याबरोबर वाड्यातील वातावरण बदललं होत...

" समीर..काळजी करू नकोस आता मी आलोय .त्या दृष्ट आत्मा आता काहीही करू शकणार नाही. आपल्या ला लवकरात लवकर पूजेला आरंभ करावा लागेल नाहीतर वेळ निघून जाईल"  स्वामी समीरला दिलासा देतात.

समीर ,अमोल आणि निलेश स्वामींच्या पाया पडतात. स्वामींचे शिष्य त्यांच्या सांगण्यानुसार पूजेची सगळी तयारी करतात. मोठे मोठे दोन रिंगण केले जाते त्या रिंगणात समीर आणि त्याच्या मित्रांना बसवले जाते. प्रत्येकाच्या हातावर रक्षा कवच बांधल्या जाते.मध्यभागी अग्निकुंड पेटवल्या जातो. स्वामी मंत्र म्हणायला सुरुवात करतात. संग्राम आणि कालिंदी विघ्ने आणण्याचा प्रयत्न करत असते.पण स्वामींच्या दैवी शक्तीपूढे त्यांची दृष्ट शक्ती काम करत नाही.. जस जसे मंत्र पठण होत तस तशी संग्राम आणि कालिंदीची ताकद कमी व्हायला लागते. त्यांचा जळफळाट होतो. स्वामी एक विभूती समीर ला देतात आणि वरच्या खोलीत जाऊन त्या पेटीवर टाकायला सांगतात. त्यात एक बाहुली असेल ती बाहुली या अग्निकुंडात टाकायची आहे. त्यामुळे कालिंदीचा आत्मा मुक्त होईल आणि लगेचच संग्रामचा ही.आणि हे ही सांगतात की ती बाहुली हातातून खाली पडायला नको ती जर खाली पडली तर आपण काहीही करू शकणार नाही म्हणून सावकाश ती बाहुली खाली घेऊन ये.समीर ती विभूती घेऊन वर जातो आणि पेटीवर टाकतो तशी ती पेटी उघडते.त्यात असलेल्या सगळ्या वस्तू नाहीश्या होतात फक्त उरते ती बाहुली ज्यात कालिंदीचा आत्मा कैद असतो. समीर ती बाहुली घेऊन खाली येत असतोच की त्या दोन दृष्ट आत्मा एक होऊन खाली लोटतात समीरच्या हातातली धक्क्यामुळे ती बाहुली हवेत उंच उडते.आणि समीर पायऱ्यांवरून घरंगळत खाली येतो.

   कुजबुजेने समीरला जाग येते.त्याच डोकं प्रचंड जड झालेलं असते. तो एकदम उठून बसतो .समोर त्याचे आई बाबा,अभय,अमोल,निलेश ,स्वामी मार्तंड आणि जनाकाका उभे असतात..

" स्वामी ती बाहुली पडली माझ्या हातून आता काय करायचं आपण ते दोघे नाही सोडणार आता आपल्याला" समीर प्रचंड घाबरलेला असतो..

स्वामी आणि बाकीचे इतके शांत कसे याचा त्याला प्रश्न पडतो. आणि त्याचे आईबाबा इथे कसे याचेही त्याला नवल वाटते..

" समीर बाळा त्या दोन दृष्ट शक्तीचा काल रात्रीचं अंत झाला" स्वामी मार्तंड

" पण कसा काय ती बाहुली तर माझ्या हातून खाली पडली" समीर गोंधळलेला असतो..

" हो तुला त्या दोघांनी धक्का दिला तसा ती बाहुली हवेत उंच उडून सरळ अग्निकुंडात पडली. तिचा जळफळाट झाला आणि कालिंदीचा अंत झाला .तिचा जसा अंत झाला तसाच संग्रामचा ही आत्मा मुक्त झाला.तू पायऱ्यावरून खाली पडल्याने बेशुद्ध होतास म्हणून तुला काही आठवत नाही" स्वामी मार्तंड..

हे ऐकून समीरला प्रचंड आनंद होतो.वाड्यातील वातावरण पूर्णपणे बदलेल होत. अनेक वर्षांपासून नसलेली जीव सृष्टी पुन्हा परतली होती.समीरच्या आई बाबांना अभय ने फोन करून सगळं सांगितल आणि वाड्यावर बोलवून घेतलेले होते.त्यांना समीरचा प्रचंड अभिमान वाटतो. स्वामींचे सगळे जण आभार मानून आशीर्वाद घेतात .सगळ्यांना आशीर्वाद देऊन स्वामी निघून जातात. समीर निर्मला आजीच्या खोलीत येतो.आणि हाक मारतो ..निर्मला आजी येते..

" आजी आपला वाडा मुक्त झाला आहे.सगळ्यांना न्याय मिळाला " समीर आनंदाने निर्मला आजीला सांगतो..

" हो बाळा मुक्त झालाय आपला वाडा .तू सगळ्यांना न्याय मिळवून दिला .तुझा खूप खूप अभिमान वाटतो मला .समीर आता माझी जायची वेळ झाली आहे.तुला शेवटच भेटायला मी थांबली होती. समीर माझी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेव  या वाड्याच्या संपत्तीचा वारसा पुढे नाही नेला तरी चालेल पण तुझ्या पूर्वजांचा असलेला आणि तुझ्याही अंगी असलेला प्रेम,सहानभूती,दया,माणुसकी यांचा वारसा जरूर पुढे ने आणि तो जप .माझे आणि तुझ्या पूर्वजांचे आशीर्वाद कायम तुझ्या पाठीशी आहे . तुझी खूप भरभराट होऊ दे.( समीर चे आई बाबा,जनाकाका आणि त्याचे मित्र तिथे येतात,समीरच्या मित्रांना आजी म्हणते) बाळांनो तुम्ही खरंच खूप खूप चांगले आहात किती प्रेम करता समीर वर तुम्ही तुमची मैत्री पूर्णपणे निभावली आहे असेच कायम सोबत रहा."  निर्मला आजी

सगळे आजीला हात जोडुन नमस्कार करतात.आजी आशीर्वाद देऊन तृप्त मनाने अदृश्य होते.

काही दिवसानंतर समीर शहर सोडून आई वडिलांसोबत वाड्यावर कायमच राहिला येतो .त्याच्या पूर्वजांनी गावासाठी केलेले कार्य त्याला आता पुढे न्यायचे असते. गावासाठी खूप करायचे असते . वाड्याची शांतीपूजा करून त्याचे कुटूंब राहण्यासाठी येतात. अनेक वर्षांपासून उदास,भकास पडलेला वाडा पुन्हा पूर्वी सारखा हसू लागतो..समीरचे मित्र कायम त्याच्या पाठीशी असतात.ते जरी शहरात असले तरी समीरची आठवण आली  तेंव्हा ते गावी येतात.. समीरच्या गावी राहण्याचा निर्णयामुळे त्यांनाही त्याचा अभिमान वाटतो.एका वर्षाने समीरच लग्न झालं ,बऱ्याच वर्षांनी वाड्यात मंगल कार्य झालं.समीरने या एका वर्षात गावाचा खूप विकास घडवून आणला होता. त्यामुळे गावात त्याला मानाचे स्थान मिळाले आबासाहेबांच्या प्रमाणे समीरच्या शब्दाला  गावात मान होता.. जनाकाका असतातच त्याच्या मदतीला.आता वाड्यात अजून एका चिमुकलीचे आगमन झाले ती म्हणजे समीरची मुलगी.पहिल्यांदा जेव्हा समीरने त्याच्या तान्हुलीला हातात घेतले तेंव्हा त्याचे डोळे आनंदाने भरून आले आणि नकळतपणे त्याच्या तोंडून बाळासाठी " राधा"  नाव आले.

   

    राधाच्या येण्याने किती तरी पिढ्यांनंतर पाटील घराण्याला लेक मिळाली होती.


निर्मला आजीच्या म्हणण्याप्रमाणे समीरने त्याच्या घराण्याचा चांगुलपणा चा वारसा कायम पुढे नेला. वाड्याचे मांगल्य परत  झाले . निर्जीव झालेला वाडा पुन्हा सजीव झाला..

समाप्त.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाड्याचे रहस्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सापळा
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
खुनाची वेळ
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
 भवानी तलवारीचे रहस्य
गांवाकडच्या गोष्टी
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
अजरामर कथा
विनोदी कथा भाग १
रत्नमहाल
गावांतल्या गजाली