" थांब समीर  नको दार उघडू ही त्या दोघांची चाल आहे तुला बाहेर काढण्याची .तुम्ही इथे आहात तोवर सुरक्षित आहात "निर्मला समीरला दार उघडण्यापासून थांबवते..

" पण आजी बाहेर तर पडावं लागेलच न.त्या शिवाय मी कस त्यांना संपवणार,अस घाबरून चालणार नाही. मला जावंच लागेल .तुला ,तुझ्या राधाला आणि वाड्यातील सगळ्या सदस्यांना न्याय मिळवून द्यायचा आहे मला. " समीर

तेवढयात बाहेरचा आवाज शांत होतो .सगळ्यांच्या लक्षात येत की नक्कीच हा भास निर्माण करण्यात आला होता.

निर्मलाच्या डोळ्यात पाणी येत ."  बाळा तुला आमच्या सगळ्यांबद्दल किती जिव्हाळा आहे हे बघून खूप आनंद झाला.समीर पण अस तू बाहेर जाण योग्य नाही . सगळं नीट ऐकून घे माझं . दोन दिवसांनी अमावस्या आहे आणि  या रात्री त्या दोघांचीही ताकद वाढेल .संग्रामने अमोलच्या शरीरात प्रवेश मिळवला होता  ,त्याच्या गळ्यात सुरक्षा कवच नाही आहे तू जर दार उघडलं तर अमोलच्या जीवाला संग्राम हानी पोहचवू शकतो." निर्मला

" आजी तू सांग मग काय करायच पुढे" समीर

" येणाऱ्या अमावस्येलाच तुला त्यांना संपवाव लागेल. पण त्या आधीचे हे दोन दिवस तुमची खूप मोठी परिक्षा घेणारे आहेत. ती कठीण परिस्थिती तू कशी हाताळलतो यावर पुढच सारं अवलंबून आहे. त्या आत्म्यांना कैद करतांना स्वामींनी सांगितलं होतं की या घराण्याचा वारस वाड्याला अनिष्ट शक्तींपासून मुक्त करेल  आणि हे ही  म्हणाले की त्यावेळी मी नसेल पण माझ्या शिष्यांपैकी एक शिष्य असेल जो तुमची मदत करेल .  समीर तुझ्याकडे ती दैव शक्ती आहे ज्याने तू या वाईट शक्तीचा नायनाट करू शकशील पण तुला एकट्याने हे करणं शक्य नाही .संग्रामने कालिंदीचा आत्मा तिच्या कुठल्यातरी  वस्तूत कैद करून ठेवला आहे .ती वस्तू त्या वरच्याच खोलीत आहे ती वस्तू नष्ट केली तरच कालिंदीचा आत्मा मुक्त होईल.पण ते तितकं सोपं नाही ,त्यांच्या शक्तीपूढे आपण काहीच करू शकत नाही .आपल्या ला स्वामींच्या शिष्याला इथे आणावं लागेल त्यांची शक्ती आणि तुझी शक्ती  मिळून त्यांचा नाश करता येईल." निर्मला

" आणि संग्रामचा नाश कसा होईल"? निलेश

"कालिंदी चा आत्मा मुक्त झाला की आपोआप संग्रामचा ही आत्मा नष्ट होईल ." निर्मला

"पण आजी स्वामींचे शिष्य इथे येतील कसे"  समीर

" त्यासाठी तुमच्यापैकी एकाला या वाड्यातून बाहेर पडावं लागेल आणि जनाच्या मदतीने टेकडीवरील आश्रमात जाऊन त्या शिष्याला इथे आणावं लागेल .पण समीर आणि अमोल तुम्हाला  नाही जाता येणार .कारण अमोलच्या  शरीरावर आता त्या दृष्ट शक्तीने ताबा केला आहे आणि समीर तुलाही नाही जाता येणार .तू जर बाहेर गेला तर अमोलचा जीव ते  घेतील म्हणून अभय आणि निलेश या दोघांपैकी कोणाला तरी एकाला  जावं लागेल पण मुलांनो अस सहज तुम्हाला बाहेर पडता येणार नाही ." निर्मला

" आजी मी जाईल त्या टेकडीवर तुम्ही सांगा मला कस बाहेर पडता येईल" अभय

" अभय तुला अस चित्र उभ करावं लागेल की तू त्या दोघांना घाबरून समीरची साथ सोडून इथून जात आहेस.त्यांना असे वाटेल की समीरचे मित्र त्याला सोडून जिवाच्या भीतीने पळून जात आहे त्यामुळे त्यांना समीरला मारणं सोपं जाईल अस वाटेल . तू इथून सरळ जनाला भेट आणि साऱ्याची कल्पना दे दोघे मिळून स्वामींच्या शिष्याला  इथवर घेऊन या. अभय एक लक्षात वाटेत अडचणी येतील पण घाबरू नको  ,प्रयत्न सोडू नको शंभू तुझ्या पाठीशी आहे. उद्या सकाळी सकाळी तू इथून निघ  त्यावेळी त्या दृष्ट शक्ती काहीही करू शकणार नाही. माझे आशीर्वाद तुमच्या कायम पाठीशी आहे.आजची रात्र तुम्ही इथेच रहा " निर्मला

" पण आजी त्या दोघांना आपल्या योजनेबद्दल कळणार तर नाही न" समीर

" नाही कळणार .या खोलीच्या आत काय बोलणं झालं हे त्यांना नाही कळणार ,निश्चिंत रहा" निर्मला.

इतकं बोलून निर्मला अदृश्य होते .ती रात्र समीर आणि त्याचे मित्र अक्षरशः जागून काढतात .सकाळ होताच चौघेही  त्या खोलीच्या बाहेर पडतात.ठरल्या प्रमाणे अभय समीरशी भांडण करतो आणि मला  भीती वाटते मी या वाड्यात म्हणून मी इथून चाललोय अस सांगून तिथून बाहेर पडतो. संग्राम आणि कालिंदी सूक्ष्म रुपात तिथेच असतात. समीर आणि अभयचा  झालेला वाद बघतात . त्या सगळ्यांना त्या खोलीच्या बाहेर बघून संग्राम आणि कालिंदी एकमेकांकडे बघून कुत्सितपणे हसतात. आपली शिकार  जाळ्यात अडकल्या चा त्यांना  आनंद होतो. अभय वाड्यातुन निघून थेट जनाकाका कडे जातो. जनाकाकांची बायको दार उघडते. अभय आत जातो तर जनाकाका तापाने आजारी असतात. अभयला बघून ते उठून बसतात. अभय त्यांची चौकशी करतो . आणि वाड्यात घडलेला एक एक प्रसंग जनाकाकांना सांगतो ..

" मालक म्या भी वाड्याबद्दल माहिती जमा करायचा लई प्रयत्न केला पण मले काही मिळालं नाय.. अन काल तापाने बिमार पडलो म्हणून वाड्यावर नाय येता आलं. पण तुम्ही जे सांगितलं ते लईच वंगाळ हाय. आपल्याला लवकर जायला पाहिजे चंदनपुरी ला " जनाकाका

" अहो काका तुम्हाला तर ताप आहे ." अभय

" काय नाय होत जी मले, धाकल्या मालकाच्या जीवापुढं माई तब्येत नाही महत्वाची" जनाकाका..

जनाकाकाची तब्येत ठीक नसूनही ते चंदनपुरी साठी जायला निघतात..


------------------------------------------------------------- वाड्यावर भयाण शांतता होती समीर,अमोल आणि निलेश विचारात असतात.समीरला सध्या अमोलची काळजी वाटत असते. त्याला खुप जखमाही झालेल्या असतात. निलेश त्यांच्यासाठी खायला करतो. अमोलच्या जखमा खूप ठणकत असतात.म्हणून समीर आणि निलेश त्याला वरच्या  खोली मध्ये आराम करायला सांगतात . दुपार होते समीर आणि निलेश संग्रामच्या खोलीमध्ये कालिंदीचा आत्मा कुठल्यातरी वस्तूत कैद असतो ती वस्तू शोधायला जातात.समीर आणि निलेश संग्रामच्या खोलीत येतात .आत भयाण शांतता  असते .दिवसा ही खोलीत काळोख दाटला होता. अभद्र शक्तीचा वावर प्रकर्षाने जाणवत होता.निलेश मनातून खूप घाबरलेला होता.समीर मात्र वाड्याला त्या दृष्ट शक्तीपासून मुक्त करण्यासाठी आणि त्याच्या पूर्वजांना न्याय मिळवून देण्याच्या ध्येयाने झपाटला होता.
       खोलीत पाय टाकताच मांजर गुरगुरण्याचा आवज येऊ लागला. लाईट गेल्यामुळे दोघांनी मोबाईल चे टॉर्च सुरू केले आणि इकडे तिकडे
शोधू लागतात ती वस्तू मिळते का.

" निल्या ,त्या दिवशी आपण या खोलीत आलो तेव्हा एक पेटी होती त्यात तर नसेल काही" समीर ला अचानक त्या पेटीची आठवण येते..

" हो सम्या ..तुला तो फोटो त्या पेटीतच मिळाला होता..चल ती पेटी शोधु" निलेश..

दोघेही शोधत त्या पेटीजवळ जातात.समीर पेटी उघडतो तसा खोलीचं धाडकन दार वाजते.समीर आणि निलेश दचकुन मागे बघतात तर एक सावली आत येते ..

" अमोल काय झालं " समीर

 

ती सावली अमोल ची असते

" अमोल नाही संग्राम आहे मी" अमोलच्या शरीरातुन संग्राम बोलतो..

निलेश ,समीर घाबरतात..

" सोड त्याला संग्राम, त्याने काय बिघडवल आहे .तुझं वैर माझ्याशी आहे .त्याला नको त्रास देऊस" समीर रागाने ओरडतो..

संग्राम कुत्सितपणे हसायला लागतो..

" तुला एवढीच काळजी आहे मित्राची तर काढ ती माळ " संग्राम

" कशाला छळतो आहात तुम्ही आम्हाला काय वाकडं केलं आहे आम्ही. या वाड्याची वाताहत करून पोट नाही भरला का अजून किती निचपणा करणार आहात.." समीर

" आम्ही किती नीच आहोत हे अजून तुला माहिती नाही .थांब तू दाखवतो तुला" संग्राम

संग्राम अमोलच डोकं जोरजोराने भिंतीवर आपटायला लागतो..हे बघून समीर आणि निलेश कळवळतात ..अमोल सोड म्हणून संग्रामला गळ घालतात..पण संग्राम ऐकत नाही अमोलच डोकं रक्त बंबाळ होत आणि तो बेशुद्ध होऊन खाली पडतो..


------------------------------------------------------- ---
अभय आणि जनाकाका चंदनपुरी ला पोहचतात तर खर पण  टेकडी तिथून खूप लांब असते आणि तिथे जायला कुठलेही वाहन नसते .शेवटी पायीपायी निघतात. जनाकाकांना अशक्तपणा मुळे  नीट चालता येत नाही  अभय त्यांना आधार देत असतो. टेकडीवर जायला कच्ची पायवाट असते . हळूहळू चालत ते संध्याकाळी टेकडीवर पोहचतात..तिथे दुरूनच एक मंदिर त्यांना दिसू लागते .. मंदिराजवळ येताच जनाकाका थकून खाली बसतात.
अभय मंदिरात प्रवेश करतो. ते मंदिर महादेवाचं असते. तो कोणी दिसते का म्हणून शोधू लागतो तर त्याला एक पर्णकुटी दिसते. अभय जनाकाकांना आत घेऊन येतो. दोघे कुटी कडे जातात. कुटीजवळ गेल्यावर भगव्या रंगाचे वस्त्र घातलेले दोन पुरुष दिसतात. चेहऱ्यावरन खूप प्रसन्न आणि तेजस्वी दिसत असतात. जनाकाका आणि अभयला बघून ते खूप आस्थेने चौकशी करतात. आत बसायला सांगतात .प्यायला पाणी देतात.. थोडं शांत वाटल्यावर अभय त्यांना संपूर्ण कहाणी सांगतो..तेव्हा त्यातील एक व्यक्ती सांगतो की या विषयी त्यांना काहीही माहिती नाही त्यांचे गुरू मार्तंड स्वामी आपल्या काही शिष्यांसोबत बाहेर गावी गेले आहेत आणि ते कधी येतील हे सांगता येणार नाही... अभय हताश होतो पण त्याला निर्मला आजीचे शब्द आठवतात वाटेत अडचणी येतील पण भिऊ नको . अभय ठरवतो की स्वामी येई पर्यंत इथेच थांबायाच येत्या एक दोन दिवसात स्वामी परत येऊन वाड्यावरील संकट दूर करतील  की वाड्यावर काही अनिष्ट घडेल ???

 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाड्याचे रहस्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सापळा
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
खुनाची वेळ
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
 भवानी तलवारीचे रहस्य
गांवाकडच्या गोष्टी
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
अजरामर कथा
विनोदी कथा भाग १
रत्नमहाल
गावांतल्या गजाली