रात्र वैऱ्याची असते.समीर व त्याचे मित्र भेदरले असतात.काय करावं ?कस सगळं माहिती करून घ्यावं या विचारात ते असतात.कोण असेल ती आत्मा आणि तिचा मालक याचाच विचार ते करत असतात.चौघांना झोप येत असते पण भीतीमुळे झोप लागत नाही. सकाळ होते पुन्हा दारावर खटखट होते.चौघेही खाली जाऊन दार उघडतात.जनाकाका आलेले असतात.

" काय पोरांनो ,झालं व्हय चिखलदरा पाहून.आज कुठं जायचा बेत हाय" जनाकाका विचारतात.

चौघे घाबरलेले असतात..

" काय झालं तुम्ही अस घाबरलेले दिसता हाय" जनाकाका काळजीने विचारतात.

"काका काल खुप भयंकर प्रकार घडला" समीर  रात्री घडलेला प्रकार सांगतो..

" काय??मालक चला इथून तुमच्या जीवाला धोका हाय नका राहू इथं..कोण व्हय ती आत्मा मला बी नाय ठाव .आपण नाही लढू शकत तिच्या संग" जनाकाका विनंती करतात..

" नाही काका मी नाही येणार" समीर निर्धार करून बोलतो..

"अस काय करता मालक मी हात जोडतो तुम्हांसनी ,हट्ट सोडा चला इथन" जनाकाका

" अस कस जाणार आहे काका इथून, मला शोध घ्यावाच लागेल ,तुम्ही काही माहिती गोळा करून आणू शकता का या वाड्याविषयी ? गावात असतीलच न कोणी ना कोणी ज्याला या वाड्याबद्दल माहिती असेल"समीर

" गावात तस कोन ह्याय की नाय मला बी ठावं  नाय, पन म्या बघतो काही माहिती भेटते का ते.मालक आपन मोठया मालकाले बोलू का इथं मले लय काळजी वाटतिया तुमची" जनाकाका

" नाही काका बाबांना यातलं अजिबात कळू द्यायच नाही यातलं ,ते इथे आले तर त्यांच्याही जीवाला  धोका आहे, आणि सगळंच अवघड होऊन बसेल" समीर ..

" तुम्ही म्हनता ते बी बरोबर हाय , पन मालक आता काय करायच आपन " जनाकाका

" काका तुम्ही बाहेरून काही माहिती मिळते का ते पहा, आम्ही इथे वाड्यात शोधतो"समीर.

  जनाकाका थोड्या वेळ थांबून निघून जातात.अंघोळी वगैरे आटपून चौघेही  पुढे काय करायच म्हणून चर्चा करत असतात..

" सम्या आपण या वाड्यात काही मिळते आहे का शोधायचं का"? अमोल विचारतो.

" हो अम्या मलाही तेच वाटतं आहे" समीर

" पण सगळ्यांनी सोबतच शोधू,एकट्याने कोणीही कुठे जायच नाही"  अभय सगळ्यांना उद्देशून बोलतो.

सगळे उठतात आणि एक एक खोली तपासतात.खालच्या खोल्यामध्ये काहीच माहिती मिळत नाही..मग वरच्या खोल्या तपासतात पण जुन्या अडगळीच्या सामना व्यक्ती रिक्त काहीच मिळत नाही...

" सगळं शोधून झालं इथे तर काही च नाही"समीर

" सम्या  समोर बघ अजून एक खोली दिसते आहे " अमोल

" हो रे दोन दिवस झाले आपल्याला इथे येऊन पण खोली नाही दिसली कधी, चला जाऊ या" समीर .

चौघेही त्या खोली जवळ जातात . त्या खोलीला कुलूप असत. आणि बरेच लाल पिवळे धागे गुंडाळले असतात. जणू काही ती खोलीत जे काही आहे हे त्या धाग्यांनी बांधलं आहे..

"नक्कीच आत भयंकर काहीतरी आहे म्हणून  तर हे अभिमंत्रित केलेले  धागे बांधले आहे.सम्या नको उघडू ही खोली ,माहिती नाही कुठलं नवीन संकट असेल आत"  निलेश घाबरून बोलतो..

" निल्या हे दार उघडावच लागेल .काहीही असू दे. अम्या खाली जाऊन बघ काही मिळते का तोडायला" समीर..

  अमोल खाली जाऊन कुलूप तोडण्यासाठी बत्ता  घेऊन येतो. त्यावर असलेले धागे काढून टाकतात .मोठ्या प्रयत्नाने ते कुलूप तुटते.समीर दरवाजा उघडतो तसा अत्यंत कुजलेला वास यायला लागतो ,त्या वासाने त्यांचा जीव  गुदमरायला लागतो.. चौघे आत जातात.खोली खूप वाईट अवस्थेत असते. खूप भयाण वातावरण दिवसा ही भीती वाटेल असे. समीरला जाणवते की पाठीमागच्या खोलीतही असाच कुबट वास आणि हाड गोठवणारी थंडी होती . म्हणजे नक्कीच इथेही अमानवी शक्ती असणार.इतर खोलीच्या मानाने इथे खूप थंड वाटतं होत. खोली चांगली मोठी असते..तिथे एक मोठी पेटी असते .समीर पेटी उघडतो त्यात जीर्ण झालेले पुस्तक ,काही कागद आणि फोटो असतात .समीर बारकाईने फोटो बघतो . त्या फोटोतील पणजोबा आणि आजोबा,आजी ला तो बरोबर  ओळखतो .पण त्यात अजून दोन व्यक्ती असतात एक स्त्री आणि एक पुरुष त्यांना तो ओळखत नाही.अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे त्या फोटोतील समीरच्या पणजोबा, आजी ,आजोबा आणि त्या स्त्री च्या चेहऱ्याच्या  भोवताली लाल रंगाने गोल केलेले होते. गूढ आणखीन वाढले होते. खोलीत बाकी विचित्र वस्तू सापडतात ज्या तुटल्या असतात. तिथेही उपयोगी अस काही हाती लागत नाही. निराशा पदरात घेऊन ते बाहेर पडतात.

दिवस पटकन निघून जातो पुन्हा ती भयाण रात्र येते.रात्रीचे जेवण आटपून चौघे झोपायला त्यांच्या खोलीत जातात. दार खिडक्या पक्क्या लावून ते झोपतात.हळूहळू जशी रात्र पुढे सरकते तशी वाड्याची भयाणता  आणखीन वाढते. रात्री कसल्याश्या आवाजाने अमोल ला जाग येते. खोलीच्या बाहेर कोणीच्या तरी चालण्याचा आवाज त्याला येतो . तो उठून दाराजवळ जातो तर कोणीतरी पायऱ्या उतरून खाली जात असल्याचं त्याला जाणवते..अमोल दार उघडून बाहेर येतो. पायऱ्यांजवळ येतो तर तिथे कोणी नसते.म्हणून तो खाली येतो . खाली येऊन बैठकीच्या मध्यभागी उभा राहून बघतो कोणी। आहे का पण त्याला कोणी दिसतं नाही. आणि तितक्यात अमोल च्या हातावर काही तरी पडतं. तो दचकून वर बघतो ,तीच मागच्या खोलीतली पिशाच्च स्त्री झुंबरावर उलटी लटकलेली असते. ती स्त्री उलटी लटकून जोऱ्याने ते झुंबर हलवत असते. हे दृश्य बघून अमोल प्रचंड घाबरतो त्याच्या मोठयाने ओरडाव वाटते पण भीती मुळे आवज निघत नाही. ती भयानक आत्मा झुंबरवरून भिंतीवर उडी घेते आणि पाली सारखी खाली सरपटत येते. तिला बघून अमोलच्या जीवाचं पाणी होत. ती स्त्री हळूहळू सरपटत अमोल जवळ येत असते.अमोल भीतीने मागे मागे सरकत असतो.त्याला अस मागे सरकताना बघून ती स्त्री हसायला लागते आणि म्हणते " मालक हे बघा तुम्हांसनी नवीन शरीर गावलं बघा, याच्या आत जा आणि संपवा त्या दादासाहेबाच्या नातवासी."ती स्त्री कोणाला मालक म्हणून बोलत असते हे अमोल ला कळतं नाही त्यांच्या दोघा वैतिरिक्त त्याला तिथे कोणी दिसत नाही.  पण हळूहळू ते दोन लाल डोळे दिसायला लागतात आणि ते अमोलच्या जवळ जवळ यायला लागतात..


वरची खोली उघडल्याने कोंडून ठेवलेला अजून एक आत्मा बाहेर पडतो. कदाचित त्या स्त्री आत्म्याचा हाच तो मालक असावा.. पण तो नेमका कोण आहे आणि अमोलच्या शरीरात प्रवेश मिळवेल का???
क्रमशः


 

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाड्याचे रहस्य


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सापळा
सुधा मुर्ती यांची पुस्तके
झोंबडी पूल
खुनाची वेळ
श्यामची आई
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
 भवानी तलवारीचे रहस्य
गांवाकडच्या गोष्टी
भूते पकडणारा  तात्या नाव्ही
अजरामर कथा
विनोदी कथा भाग १
रत्नमहाल
गावांतल्या गजाली