ऋचा बाहेर बाकावर बसून मोबाईलमध्ये काहीतरी टायपिंग करत होती. तावडे तिच्या बाजूला बसून होत्या. शिंदेंनी ऋषिकेशला उठवला. ऋषिकेश त्याच्या तुरुंगातून बाहेर आला. आणि गुमान शिंद्यांच्या मागे चालू लागला. त्याने पाहिलं बाकावर ऋचा बसली होती. तिने त्याच्याकडे पाहत एक छान स्मितहास्य केलं. ऋषिकेशने तिच्या डोक्यावरून हात फिरवला. तो पुढे निघून गेला.

“ये बस आता तुझं स्टेटमेंट घेणार आहे. सगळं काय घडलं सांग. जेवणार का??” कदमांनी चिकन बिर्याणीची प्लेट समोर ठेवून विचारलं.

त्याने ती प्लेट जवळ खेचली आणि पटकन लांब ढकलली “ मी शाकाहारी आहे. मला हे सगळं अजिबात आवडत नाही आणि आमच्या घरात चालत नाही.” ऋषी जरा रागातच म्हणाला.

"आत्याचा गळा चिरताना आवडंलं का मग?" कदमांनी दरडावुन विचारलं

"चुकताय तुम्ही...!! ऋचा तुम्हाला बोलाली नाही का? मी सांगुन पाठवलेलं तिला.. हा हा हा... तुम्ही माझ्याकडे असं काय बघताय..??" ऋषीने विचारलं आणि खुर्चीत मागे रेलुन जोरजोरात हसु लागला. 

"मी तिला मगशीच सांगितलं. मला हा खेळ बास झालाय. कंटाळा आलाय मला. तुम्हाला एक सांगितलं तर खोटं वाटेल.." ऋषीकेश टेबलावर समोर रेलुन बसला आणि त्याने डॉ. रेगेंना हाताने जवळ येण्याची खुण केली. डॉ.रेगे पुढे वाकले. त्यानी आपला कान त्याच्याजवळ नेला.

"मी जो विचार करतो ना तो सत्यात उतरतो...!" त्याने थेट नजर कदमांच्या नजरेला भिडवली. ऋषीची नजर कदमांना बोचत होती. त्याचे निर्भय डोळे एका परफेक्ट क्राईमची साक्ष देत होते.

"म्हणजे नक्की काय करता तुम्ही बहिण भावंड...??" कदमांनी विचारलं.

"लहान असल्यापासुनच हे होतंय. आम्ही सातवीत होतो. तेंव्हा.... नाही... त्याधी म्हणजे पाचवीत होतो. तेंव्हा बाबा दादाला खूप ओरडले होते. आम्ही अभ्यास अर्धवट सोडून खालच्या मजल्यावरच्या मुलांबरोबर खेळायला गेलेलो" ऋषीकेश थांबला आणि त्याने एक कटाक्ष डॉ.रेगेंवर टाकला.

" अरे, हेच तर मगाशी ऋचाने सांगितलं होतं." त्यांनी आश्चर्यचकित होऊन कदमांना सांगितलं.

"तुम्हाला वाटलं ना की ते शब्द ऋचाचे होते... हा...हा...हा... हिच तर गंम्मत आहे आयुष्यातली. बोलत ऋचा होती पण, शब्द माझे होते.. आम्ही खुप लहानपणापासूनच एकमेकांचे विचार ऐकु शकतो. मी तर तिचे विचार कंट्रोलही करु शकतो. पण तिच्या इतकी चांगली निर्णयक्षमता नाही माझ्यात त्यामुळे मी फक्त विचारच करु शकतो.. ऋचा मात्र सगळे विचार सत्यात उतरवते... हा हा हा..." ऋषिकेश वेड्यासारखे हसु लागला.

" तुला वेड्याच्या इस्पितळात न्यायची गरज आहे." इतकावेळ शांत असलेली आरती वाघ म्हणाली.

"तो ही प्रयत्न करुन झाला. पण.." ऋषिचा चेहरा अचानक दुःखी झाला. त्याच्या डोळ्यातुन घळाघळा पाणी वाहायला लागलं.

"मी ऋचापासुन लांब राहिल्यामुळे तिला माझे विचार कळत नव्हते. मी ही हतबल झालो. माझ्यात काही करायची ताकद नाही. ऋचा त्यामानाने फारच सक्षम आहे. ती करुन टाकते.. हेच तिचं माझ्यावरचं प्रेम म्हणा ना.." रडवेला चेहरा अचानक हास्यात बदलला.

"माईला मारायचं नव्हतं. पण म्हातारी खुप घोरते ना.. माझ्या कानात अजुन तिचं ते कर्णकर्कश घोरणं घुमतंय. त्रास होतो आवाजाचा. बाबा मारातात. आई ओरडते. मला वेळच देत नाही. त्या नापास बाईला माझ्या शाळेत पाठवलं जेव्हा मला सगळ्यात जास्त आईची गरज होती. हे प्रकरण पुढे गेलंच नसतं. आईने शाळेत येऊन मुख्याध्यापक मॅडमना सॉरी म्हणायला हवं होतं. मी ही माफी मागात होतो. पण त्या माईमुळे मला रिमांडहोमला जावं लागंल. आईला वाटायचं माई जे निर्णय घेतेय ते चांगलेच असतील. माई मुळातच आमचा दुस्वास करायची पण आईला वेळ नव्हता ना याकडे लक्ष द्यायला. बाबांना वाटंत त्यांनी आम्हाला जन्माला घातलं म्हणजे त्यांचा कार्यभाग संपला" त्याची सैरभैर फिरणारी नजर आणि सततची पायाची हालचाल पाहुन तो सायकोलॉजिकली डिस्टर्ब आहे हे नक्की झालं होतं.

"तुला सायकोलॉजिकल प्रोब्लेम आहे हे सांगुन तुझा तुरंगवास कमी करता येईल." डॉक्टर म्हणाले. त्यावर आरतीने होकारार्थी मान हलवली.

"मला आता बास झालंय. मी आरतीच्या जवळ राहिलो तर हे होतंच राहिल. छोट्या घटनांपर्यंत ठिक होतं. मी आता तिच्या मुर्खपणासाठी माझ्या आयुष्याचा बळी जाउ देणार नाही. लांब राहिलो तर तिला माझे विचारच कळणार नाहीत आणि मी सुखाने राहिन ईथेच तुरुंगात.मी मान्य करतो कि, माईला मी मारलं. मला जन्मठेप द्या" ऋषिकेश हताश होऊन म्हणाला.

"घेऊन जा याला कस्टडीत, उद्या केस फाईल करु." कदम शिंदेंना म्हणाले.

ऋषिकेशला शिंदेंनी दंडाला धरुन उचलंलं. त्याला दाराकडे ढकलत पुढे चालायला सांगितलं. 

जाताना तो ऋचाजवळ थांबला आणि म्हणाला,

“एकमेकांबरोबर राहिल्यामुळे आणि जुळे असल्याचा शाप मिळाल्याने खूपच कॉम्प्लिकेटेड झालेलं. जेलमध्ये रहाणं माझ्यासाठी काही नवीन नाही...! असं घरी राहिलोच किती मी...?? आयुष्यभर तू केलेल्या चुकांची शिक्षा भोगली आहे. आत मी इथेच बरा. तुला सारं जग मोकळं आहे. आत्ता वाट्टेल तशी वाग. एक लक्षात ठेव , गुन्हा केलास तर त्याचा ब्लेम माझ्यावर टाकता येणार नाही कारण मी आजन्म कस्टडीत असेन....!”

“आपण समोर आलो, एकत्र राहिलो तर एकमेकांचे प्रतिबिंब आहोत. समोर नाही आलीस तरच बरं होईल. पुन्हा भेटू नकोस...!!” ऋषिकेश निघून गेला. ऋचा त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत राहिली.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to प्रतिबिंब


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
सापळा
झोंबडी पूल
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
अजरामर कथा
वाड्याचे रहस्य
खुनाची वेळ
श्यामची आई
लोकभ्रमाच्या दंतकथा
रत्नमहाल
गांवाकडच्या गोष्टी
कल्पनारम्य कथा भाग १
विनोदी कथा भाग १