राजेंद्र रूप तेजींद्र तुझा मुखचंद्र उगवला अरुण ।
स्वरूपाची फाकली प्रभा जशी सुप्रभा देखिली दुरुन ॥धृo॥
वय वरशें उंबर पंधराची, कोर चंद्राची, चढती कळा ।
सुंदरा बत्तिसलक्षणी सुलक्षणी चतुर आबळा ।
सकुमार तनु सुरंग, सदा खुशरंग, वर्ण सावळा ।
कवळी काया लससशी, उगवला शशी उदयाचळा ।
वर निळी कीं पोता बरी, मान साजरी, बारिक गळा ।
बोलशी बोल अनमोल, शब्द बिनमोल जशी कोकिळा ।
मृग जैसा जानी शाम जसा निशाम उभी गोपुरीं । ( ? )
श्रीफळासारखे कुच चढल उंच जोबन उरीं ।
श्रृंगार करूनिया साज देखली आज जैशी परी ।
ओतली जशी ग जंत्रात । देख देखणी चपळ नेत्रांत ।
वावडी जशि ग सूत्रांत । बाहुली जा चित्रांत । ल्यालि रंग भरुन ।
धनकर त्याने निर्मिली मोर्त गोजिरी, पाहती जन फिरुन ॥१॥
नेसुनिया बारिक झुणा चपळ फुंदणा सर्जामधीं ।
तटतटित तग कांचोळी ल्यालि, पांघरली शाल उदी ।
खुषबोई गुंफिली वेणीं पुष्प खोवूनि केवडा मधीं ।
शीसफुल हिरडा राखडी, दिसे फाकडी चपळ गुणनिधी ।
बिंदीला जडल्या चुण्या आणिक हिरकण्या नखीं मेहेंदी ।
गोरे गाल तुझा रंग लाल पाहुन खुषियाल हातामधिं मुदी ।
लविली कुंकाचि चिरी कपाळावरी शोभली बरी ।
नाकी नथणी सर्जेदार, दिसे गुलजार सुरत बावरी ।
मारसी नयनाची नोक चालुनिया येति घरीं ।
रुप लावण्याची खाणी । ल्याली बाळ्याबुगडया कानीं ।
वय लहान चतुर पद्मिनी । कैकासि लविलें ध्यानीं । घेशी मन हिरुन
तोंडोळ्यासारखे अधर, घेशि किति पदर मुखावरुन? ॥२॥
करूनी सोळा शृंगार, चाल गजभार तुझि ग सुंदरी ।
ल्यालीं नवरत्नांचा हार गळा भरदार हिरे दोहिरी ।
गळा मोहनमाळ दुलडी आणिक पंचलडी जयें त्यावरी ।
धुकधुकी जाळीचा मणी, पोत तन्मणी दिसे गोजरी ।
दंडीं वेळा बाजुबंद, ज्यानीचा फुंद तोल अबिरी ।
हातीं हातसर गजरे बरे, दिसे साजरा चुडा सोनेरी ।
ल्याली कंवर पहा सुंदर लहान उंबर तुझी कमिनी ।
वाक्या साखळ्या घनघोर वाजती जोहार नाद पैंजणीं ।
अनवठ बिचवे पोलारे उठे झणकर फार मेदिनीं ।
न्याहाळी रुप ऐन्यांत । झालि डुब नार गहिन्यांत ।
गजरात जसा सैन्यांत । तारिफ तुझ्या बोलण्यांत । गेली सरुन ।
लविला आलम तुझेवर खुशी उभे देवाशी नवस करुन ॥३॥
शृंगार करून रंगमहाली उभी राहिली सुंदरा नटुन ।
झाला संध्याकाळ नेमस्त वखत गुजरीचा गेली घनवटुन ।
पाहुन मुशाफर यार म्हणे सकुमार, आला तुम्हि कुठुन ? ।
कर शब्दाचा मान वचन प्रमाण, नका जाऊं उठुन ।
बाहारांत आली नारगी म्हणे बहुरंग जाइल विटुन ।
नको धरूं कोणाचा आदर, सांगते दर घ्या रंग लुटुन ।
उभयतां घडला संग झाले निसंग आलिंगिती ।
गुणि गोविंदराव महाराज धन्य कविराज तुमची मती ।
राणुभाई जैदेव निशाणी भिमा मल्हारी छाणुन रती ।
कडिबंद ख्याल चवचरणी । गाती सवाई करुनी ।
वैर्‍याची तडकली छाती गेले हरुन ।
झाला शाहिराचा हिरमोड, घेतली हातची डफडी हिरुन ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत