काळोखी रात्र अंधारी, उभे कां द्वारीं ? । या मंदिरांत, येइल गस्तीची फेरी ॥धृ०॥

आज काय चुकलें सेवेला ? पदरीं घाला । तुम्ही दगलबाज, बेइमान कळुनी आला । संकेत मनाचा केला, भरोसा आपला । चोरूनिया जातां लावुन पदर मुखाला । आजवर प्रसंग राखिला, उभी सेवेला । कोणती सवत मिळाली तुमच्या सुखाला ? । चाल । भुललें मी चतुरपणा । साजणा । सांगा बाहेरच्या खुणा । साजणा घालिते गळ्याच्या आणा । साजणा । उभयतां प्रीत चालवा, बसा शेजारीं ॥१॥

तुम्ही दगलबाज, बेइमान राजीवनयना । मजविशीं कां हा कंटाळा घेतल्या पैना ? । मजपेक्षां मिळाली मैना सत्य जाणा । लागला छंद प्रीतीचा रंगरस सदना । तीनदां रुसतां मनमोहना, पलंगीं या ना । कुठवर समजाऊं ? चटक लागली प्राणा । चाल । चित्तांत येइल तें करा । साजणा । माझ्या कंठींचा हारा । साजणा । नाटकी तूं नट बावरा । साजणा । पसरितें पदर लाजुन, कुणाची चोरी ? ॥२॥

गुणी जना तूं गुणीजन राया प्राण विसाव्या । उभयतां दुष्ट कल्पना मनांत नसाव्या । इथल्या रांडा कळलाव्या आहेत ठाव्या । केल्या कर्मा शेवटास न्याव्या । रूपनादर तुमची जाया । येऊं द्या माया । पसरिते पदर, चला हे इष्क करूं या । चाल । आज पहा हो माझी मजा । साजणा । रात्रंदिवस गृहीं येत जा । सजणा । नाहीं आशा धनद्रव्याची, कुणाची चोरी ? ॥३॥

सांगते, राग सोडा हो, घरीं आज रहा हो । नाना परी दाविन मौजा, मला भोगा हो । मागणें हें मजला हो ह्रदयीं धरा हो । केल्या क्रिया शेवटास न्या हो । मज कृपादृष्टीनें पहा हो, लोभ करा हो । रात्रंदिवस करिते अर्जी पयन धरा हो । चाल । चुकी घडली मजकून । साजणा । सांगा हो माझ्या प्राणा । साजणा । आज मनास मिळले साजणा । नाना परी उडवी मौजा करू बेभारी । रामा गाई छंद बंद अधिकारी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत