धन्य संन्यासी महातापसी योग्यांचा राव । मुगुटमणी महाराज सुत व्यासांचा शुकदेव । इंद्रपुरींत कीर्तमात अद्‌भुत फांकली । तेतीस कोटी देवसभा इंद्राची घनवटली । थकीत सुरवर गण-गंधर्व दीनवदनें जालीं । त्या समईं कशी युक्त आठवली । तेव्हां इंद्राने रंभा आणीवली । काय तियेसी आज्ञा केली ‘सिद्धवनासी जाईं वहिला । तप शुकदेवा ढळावें । कार्यसिद्ध करून यावें; ॥१॥

रंभा विलासी बोले तयासी ‘ऐक इंद्रदेवा । महा महा सिद्ध ऋषी अगाध देवाधिदेवा । कामाचें पाईं चुकला नाहीं शंकर माहादेव । बोले शुकदेवा कोण केवा । पाराशरासी भग्न घडावा । चंद्र गुरूपत्नीसी न्यावा । रुक्मांगद आणि नारद पाहावा । ऐसे किती एक सांगावें । ब्रह्मदेव कन्ये धरूं धावे’ ॥२॥

घेउनी आज्ञा केली प्रतिज्ञा त्याला मोहीन । तरिच रंभारत्न, नाहीं तर धीग माझें जिणें, करून जडीत बस्त्रें भूषणें ल्याली लवकुन । डोलत डोलत गजभारानें । संगीत सुरवर करी गायन, रागज्ञान तानमान । दाखवी कवतुक हावभाव । ‘तापशा, नयन उघडावे’ ॥३॥

‘सांडुन कां निष्काम जालास योगिया । सहा शट्‌ अठराचा चारी वेद, करुनीयां । जपतप साधन केलें क्ष मुद्रा लाउनियां । काम चेतलावो, नये आवराया नेटकी जाया । आली या ठायां तुसीं तुसीं भोगाया आपुली काया । निजसुख स्त्रियेचें पाहावें । नाहीं तरी जन्मा कां यावें ?’ ॥४॥

निष्ठुर वचना ऐकुन कानीं तेव्हां शुकदेवानं । पाहे कौतुक, उभी सन्मुख, देखीली कामीन । दीप्ती झळाळी कांती कोवळी लोपे नयनानें । ‘सांग लौकुन गे कोणाची कोण ? । येथें यावया काय कारण ? आम्ही तापसी योगी दारुण । पाहु नयें स्त्रीयेचें वदन । भगवंतापासी होइल हाण । लौकर उठोनियां जावें । आणखी नेणो तुझा भाव ॥५॥

‘तुझे प्रतापें बुडाले पापें बहुत थोर मागें । अहिरावण’ महिरावण कीचक बंधु अवघे गे । सुंदोपसुंद दोघे बंधु नाहीं बंधु नाहीं चुकले गे । हो हो दुर गे परती सर गे । भस्म जाला भस्मासुर गे । चंद्र कलंकी जाला वर गे । भगें इंद्रासी जाला दाग । कांहीं न चले उपाव । ऐसी स्त्रीयांची माव ॥६॥

‘चतुर सुंदर रूपनागर गोमती । जसें इंद्रायण गोजिरवाणें आतं गे कडवट । तैसें शरीर तुझें अघोर दुर्घन अचाट । अमंगळ पोट नर्क किडयांचा भरला सांट । मळमूत्राची अवघी मोट’ । तेव्हां रंभेला विशाद वाटे । घेउनी शस्त्र विदारिलें पोट । वनीं सुगंध न समावे । जैसे अष्ट गंध बरवे ॥७॥

बोले शुक योगी रंभेलागीं, ‘ऐकावी मात । बारा वर्षें नर्क भोगिला माते उदरांत । असें जरिं ठावें असतें तरी तुझ्या जन्मतों उदरांत । कां गे लज्जीत तूं मनांत ?’ शुकदेवाने जोडिले ह्स्त । ‘तुझा बाळ मी शरणांगत । पाहा पाहा रवी पश्चिमे उगवे । नेमा न चळे शुकदेव’ ॥८॥

रंभेचा गर्व हरला, सर्व रंग जाला फीका । नीर्लज्यावाणी लागे चरणीं उचीच आलें कां । केला उपाव सिद्धी व पावे येउनीं ठकलें कां ? । रंभा गेली वो रंभा गेली स्वर्गलोकां । तिची त्रिभुवनीं जाली टीका । म्हणे केशव संत साधकां । कवी अवधुता शरण देखा । कवित्व मतीनें वदलों टीका । ऐसा रचिला कटाव । पाहुन घ्यावा अनुभव ॥९॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत