हाय मोरे लालन का होइन जोगन । अज बैरागीण बाई ।
सख्या गुणि रत्नाचे पाई ॥धृ०॥
स्वरूपसुंदर हें लावण्य मूर्त खाशी ।
ईश्वरें घडीवली ऐशी ।
तनु माझी ग बहु केली ग सायाशीं ।
उणी नाहीं तील ठेवायासी ।
माझ्या स्वरूपाचा जोडा ग राजबनसी ।
टाकुन गेला परेशासी ।
चाल । वय द्वादश वर्सांता नवे नवतीच्या भरांत ।
कमळण आली रसास । कोण घेईल सुवास ? ।
सख्याविण काय करूं ग ? । किती जीव मुठींत धरूं ग ? ।
कसें दर्यामंदि तारू ग । थडीस कोणी लावा ग बाई ॥१॥
येक चंद्रमा, भवतीं नवलाख तारा ।
त्याविण शून्य हो पसारा ।
काय मंदिरीं जळूनी काट भारा (?) ।
दीपकावाचून अंधेरा ।
व्यर्थ रिकाम्या जमा करून गारा ।
लाल नही, अवघ्या दूर सारा ।
चाल । मोराचे चांगुलपन झुरे पाहुन आपले पायासी ।
जी गत बाई माझी हिकडं ती गत असल तिकडं त्यासी ।
ही काया हंसाविण ग ।
कौव्री फे ( ) फळावाचून ग ।
स्वामीविण मंदिर सुनें ग । धुंडाळी दिशा दाही भला ग ॥२॥
कोणासी दावूं सोळा शृंगार करून लेणं ? ।
दैव निघेल ग ऊन । (?)
लोढतिवाशे रंगम्हालीं ग जमखाने ।
सख्याविण अवघें सुने ।
अतां नाहीं मजला या मंदिरीं ग राहणें ।
गावाबाहेर माझें ठाणें ।
चाल । धनदौलत ही अवघी द्या लुटुन बाह्मणासी ।
हत्तीघोडे हरणे रावे द्या सोडुन पक्ष्यांसी ।
जरीठाणं माझं घ्या ग । सखयांनो तुम्ही ल्या ग ।
खुशाल अपले घरीं रहा ग । आता मी वैरागीण बाई ग ॥३॥
असें ईश्वरा तुवा माजें काय केलें ? ।
पूर्वसंत्तितीं हेंच लिहिलें ।
स्वामी माझे मशिं कां अंतरले ? ।
जिवा लागले प्रेमभाले ।
दत्तात्रिया गुरूचे सुमरन केलें ।
चित्तमन लक्ष येक धरलें ।
चाल । कवीराज महाराज बिरोबा नारी आले साजण मंदिरीं ।
खुशाल माजा कर सुंदरी । सिदराम लहेरीचे ख्याल चुनदे । गलीत हो कविराज बिलंदे ।
धोंडी फकरू कवि बाजींदे । तात्याजी खंडु खुब तर्क करून गाई ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत