राम राम घ्यावा कविचा राम ।
मेहेरबान सलाम बाच्छाई मुजरा जाण ।
आदिनाथ निरंजन स्वामी आदेश तयाला ।
ब्रह्मरूप ब्राह्मण तयासी साष्टांग केला ।
नमो नाराणणबाबा सिवा शरण शिवभक्ताला ।
जये जये जये गोपाळ सिवडा मलंगासी आला ।
इथून झाले षेडदर्शन ! त्यांत आले चारी वर्ण ।
अठरापगड व याती प्रमाण । गुह्य चहु वर्णापासुन ।
शास्त्र पुराणीं पाहा जाऊन । भेद उमजावा चातुर ॥१॥
रामनाम हें काढुन झालें ऐका चातुर ।
शिवाचे ह्रदयीं जन्मलें हें राम अक्षर ।
मस्तकापासुन झालाय आमचा ऐस्तार ।
रामनाम हें नाम ठेविलें त्या शिवशंकरे ।
असें हें रामनाम थोर । शिळा तरल्या उदकावर ।
ध्रुव प्रल्हाद वाली वानर । मुक्त झाली अहिल्या नार ।
ह्रदयीं धरावा राम तो ॥२॥
रावण वीर, गर्वे फार, परंतु भक्त ईश्वराचा ।
सीतेशक्तीकारणें क्षय झाला त्या क्षत्रियाचा ।
रामरूपीं मिळाला, घडला संबंध पूर्वीचा ।
वैर भजन तत्‌समान ऐका निर्णय तयाचा ।
पहा तें जरासंधानें । वैर कृष्णासी केला त्यानें ।
तो मर्दिला राजीवनयने । अरूपरूपीं झाला भिन्न ।
रामकृष्ण नाहींत दोन । येकची म्हणावा देव तो येकची ॥३॥
राम राम म्या ऐसा केला लहानथोरासी ।
पाच तुम्ही परमेश्वर, सकळीक आणा मनासीं ।
आम्हांसी द्यावी आज्ञा, जाऊं आपले आश्रमासी ।
शांतलिंग गुरू भेटला ज्ञानी आम्हांसी ।
हा वरप्रसाद त्याचे कृपेचा । धोका नाहीं कळिकाळाचा ।
साता गवळी कवि पुण्याचा । दक्षिण देशीं धोशा त्याचा
झोके डफावर जरिपटक्याचा । नित्य करी दावा कवीशीं ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत