अमृतवेळा चांगली, एक प्रहरा निशी भागली ।
हालविते उठा, भोग द्या, येव्हांसी झोप कशी लागली ? ॥धृ०॥
कोमळवदना, तुझ्या प्रीतीची, आजपावेतों चालिवलें ।
नाही, लटकी होणार, मला तुम्ही हातीं धरुन जर घालिवलें ।
जीव देउन लाविल्या देहाचे दीप कां हो तरि मालिवले ?
आज निजले डाव्या भुर्जी
अवगुण असल तर त्यजी
नाकीचा बाल मी तुझी
पदरजीं भुकेले विषयसुखाला चित्त मनवृत्ती चांगली ॥१॥
कधिं येशील मजकडे ? पाहतों वाट तुझी अवशीपहाटीं ।
तुझ्या वियोगामुळें शरिराची जाहली फाटी ।
नका वैरता करूं, अहो मी खाइन आग तुमचेसाठीं ।
काय बोलूं तिनदा मी लगू ?
अवकृपेमधें कशी जगूं ?
नको प्रचीत बिषाची बघूं
बाळगुन आशा राहिली, थोडक्यासाठीं कशी डागली ? ॥२॥
आंतबाहेर हिंडत दु:खाची घडी कशी म्या कंठावी ? ।
धीर धरिते, सारी रात्र मला हवी तशी तुम्ही लाटावी ।
नाहीं वेडीवाकडी, शाबुत प्रीत माझी तुजला ठावी ।
पहा माझ्या स्वरूपाकडे
पाण्याचे जसे बुडबुडे
हे दिवस न येती पुढें
वय चढे दिसेंदिस, तुला शिकवितां जीभ माझी भागली ॥३॥
ताहान लागली मला, प्रीतीचें जल पाजावें आपहातें ।
दृष्टी पडतां तेव्हां तुम्हांकडे मी गायीवाणी पहाते ।
शेवट पुरता करिन, शपथ मी तुमच्या पायाची वाहते ।
सोन्यास पितळ म्हणतसा
पुढें मागें बर्‍यावर असा
होनाजी बाळा म्हणे हंसा
भरवसा देउन अंतरीं परोपरी बरि सुंदरी भोगिली ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत