हे सुवर्णचंपके सखे, तुजला घडिघडि पाहतों ।
केव्हा भेटशील म्हणुन वाट तुझी धरून उभे राहतों ॥धृ०॥
स्त्रीनायकपद योग्य शोभसी तूं सुंदर सगुणा ।
पूर्णचंद्र मुखिं ढाळ जसा बंदर सुरती दाणा ।
अवयव शुद्ध शरिरलक्षणें सामुद्रिक जाणा ।
सकल नारिमधें श्रेष्ठ तुझा दिसतो साधा बाणा ।
स्वतां कुशल, अंगिंच्या जाणसी सर्व खुणाखाणा ।
हात लाविल एक तुला, कोणता पुरुष असा शहाणा ? ।
मनोदयापासून लक्ष तुजवर पुष्पें वाहतों ॥१॥
उंचनिंच नेमस्त लहान बांधा, दंडिं वाकी ।
चिर आवरुन मेदिनी चालतां हळु पाउल टाकी ।
क्षणाक्षणा कुचकमळें हातानें पदराआड जाकी ।
वेळोवेळीं वेगळ्या तुझ्या शृंघाराच्या नोकी ।
शुद्ध विषय अम्ही लंपट झालों तुजवरते शोखी ।
मनोहरणी वल्लभे अशीच्या पाईं द्यावी डोकी ।
काय बिसाद, जिवाचीं संकटें मरणाचीं साहतों ! ॥२॥
अशि सुंदर निर्माण कोणत्या देवानें केली ? ।
स्वरुप दिसे सकुमार, ओठ जणुं पवळ्याची वेली ।
बसणें, हंसणें, बोलणें, चालणें मजालसीखालीं ।
भर नौती डळमळित, सदा जणुं मदनानें नाहाली ।
अतिनाजुक लावण्य, प्रथम तारुण्याची कळी ।
वाट चुकुन स्वर्गाची थेट रंभा भूतळिं आली ।
देह वाहतों आपला, तुला प्राणापेक्षां चाहतों ॥३॥
तुझें आमचें मन जडो, न पडो अंतर कोणे काळीं ।
दर्शनसुख वर्षते जशी पर्जन्याची पाहाळी ।
सर्वामुखिं चांगली दृष्टिनें जननेत्रीं न्याहाळी ।
तुजविरहित बायका जशा गारा रानोमाळीं ।
ब्रह्मदेवें तप केलें निराकृति जन्माचे वेळीं ।
या परिची निर्मिली सगुण गुणमुद्रा वेल्हाळी ।
होनाजी बाळा म्हणे, मागशील तेंच आणुन देतों ।
खुषमर्जी अंतरीं, तुझ्या घरिं नित येतों जातों ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत