हें चांगुलपण धन्य, जघन्यामधें लावण्याची खाणी ।
कधिं प्रीतिचा योग सांग, जिव झुरतो गे मोरावाणी ॥धृ०॥
कृष्णागर सावळें शरीर वयरून कांचनवर्णि जाणें ।
वदन आदर्शापरि दिसे जो लहान हिरकणीचें ठाणें ।
गालाभौतीं शाल दुहीरि, मुख दिसतें गोजिरवाणें ।
नथ नासाग्रीं सढळ, गुळधवि, मुक्ताफळ निर्मळ दाणे ।
न पडे नख दृष्टीस कुणाच्या, घरिं नाहीं येणें जाणें ।
शिरकमळें काढून स्वहस्तें पुरुष तुला देती वाणें ।
मृदुमंजुळ भाषणें ऐकता जन अवघे म्हणती शाणी ॥१॥
फार हळुच बोलणें मिजाजिंत, भिडमर्यादेची मोठी ।
कर्म तुझें हें नव्हें सखे, पण ऐकावें अमुचेसाठीं ।
तुझ्या आशेस्तव मोठया जिवावर दिस घालवितो नखबोटीं ।
वदन तझें एकदा चुंबुदे, जशि ग अमृताची वाटी ।
निर्मळ अंतरभाव मनामधें सत्यरीतिच्या वहिवाटी ।
तुला भोगिली अशा अक्षता कधिं लागति या लल्लाटीं ? ।
झोपाळ्यावर बसून ऐकतों तुझ्या मुखावाटें गाणीं ॥२॥
करूं जाणसी अवघ्याच विलासिक विषयांची मोठी लागी ।
रात्रीं तुज दहा वेळे वाटतें भोगावी लागोलागी ।
आम्ही किति वर्षे पहावि वाट तरी ? हा जीव जाहला वैतागी ।
जिथें बसावें तिथें होतसे स्मरण तुझें जागोजागीं ।
सावकाश पाहुंदे एकांतीं करून तुला उघडी नागी ।
मार्गामधें भेटतां येतसों आम्ही तुझ्या मागोमागीं ।
आबालवृद्धामुखिं तुला गडे वाइटशि न म्हणे कोणी ॥३॥
सगण युक्त बत्तीस लक्षणें दैवाची पाहुन धालों ।
घडणें सुखरूप घडो, पण तुझ्या समागमिं स्नेह चालो ।
नाहीं देहाची शुद्ध आपल्या, शहाणपणा तुज गडे गेलों ।
तुझ्यापाइ द्रव्यास मारली लाथ, आम्ही वेडें झालों ।
विरहविषयवेधांत विषाचा करि प्याला घेउन प्यालों ।
आशाभंग होतांच मनाचा, जित असतां केवळ मेलों ।
होनाजी बाळा म्हणे, प्रीत कर लयलेमज्नूच्या वाणी ।
तसें आपण स्त्रीपुरुष जन्मलों मृत्यूलोकींचे हे प्राणी ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत