धरिं चला, बोलाउं आले विषयभोगाला ।
सर्वस्वें जाहले अन्याय ते पोटी घाला ॥धृ०॥
दिवसानदिवस भर जातो भेटायाचा ।
करितसे आठव घडि घडि तुमच्या पायाचा ।
स्नेह आपला कोणे काळीं न तुटायाचा ।
पगदस्त जाब हा ठरला मुळ ठायाचा ।
बांधिला बंध देवानें न सुटायाचा ।
नाहीं बाण मारिला मागें उलटायाचा ।
बिनतोड जोड ही काय म्हणुन तरी त्यजिली ? ।
बेजरब पडुन गळिं अशी कंचितरी निजली ? ।
गलबलित काम, घामानें चोळी भिजली ।
रिझली नागिण झडप घालि जशी नागाला ॥१॥
लागले प्रीतिच्या मागें आचरणाला ।
घातली मिठी म्या बळकट या चरणाला ।
जोडा बरोबर, नित येते सुविचरणाला ।
शिर हजिर, पुढें, मी नाहीं, भीत मरणाला ।
सही झाले चित्त मिळालें मदहरणाला ।
मग योग्य नव्हे अंतर देणें शरणाला ।
शिरिमंत लोक तुम्ही शिरिमंतापशिं राहतां ।
एक दुसरी असून घरिं, तरि तिसरीला चाहतां ।
धुळीवरिल सारवण, लटक्या शपथा वाहतां ।
सर पाहतांना लागेना जमिन स्वर्गाला ॥२॥
सत्क्रिया वचन मर्यादा कशी टाकावी ? ।
जी छायेखालीं आली तिला झाकावी ।
वियोगें लाही शरिराची लाज राखावी ।
एक ठायीं मिठाई, मधसाखर चाखावी ।
घ्या हो इरसाल आंब्याची कोय चाखावी ।
अंगिकार केल्यावर कां दुर झोकावी ? ।
येउयेउन पाहुन मुख, उभी राहुन मुसमुसते ।
नवतीच्या आगीमुळें जळे काळीज, धुसधुसतें ।
आज उद्यां की परवा याल कधीं, तें पुसते ।
बसते सन्निध शेजारी गोष्ट सांगायाला ॥३॥
ऐकावी स्वस्थपणीं माझी ही कानगी ।
आनंदरसामृतपुर पाहावी वानगी ।
तुट तुट न पडे अशी योजावी मला देणगी ।
मउ मउ घास घ्या मयद्याची पानगी ।
जन्मोजन्माची असावी मेहेरबानगी ।
खर्चास द्यावी पोत्यावर परवानगी ।
त्या श्रवणसुखानें मोहो अंतरीं पातला ।
रत जाहली उभयतां हा मजकुर आंतला ।
होनाजी बाळा म्हणे, गळा गांठुन घातला ।
गुंतला प्राण स्वरूपाच्या व्यासंगाला ।
सृष्टीच्या नारी तव घ्याव्या पासंगाला ॥४॥

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to लावणी


चिमणरावांचे चर्हाट
नलदमयंती
सुधा मुर्ती यांची पुस्तके
श्यामची आई
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
अजरामर कथा
कथा: निर्णय
रत्नमहाल
लोकभ्रमाच्या दंतकथा
पैलतीराच्या गोष्टी
मृत्यूच्या घट्ट मिठीत