Part 1 -

आज तिने पुन्हा मला कॉल केला आणि म्हणाली, "सर, मी hdfc मधून बोलतेय!" मध्येच तिला थांबवत मी म्हणालो, "ठीक आहे! तू hdfc मधून बोलतेस, तर मी पण icici मधून बोलतोय! बोल, काय पाहिजे तुला? क्रेडिट कार्ड, पर्सनल लोन, icici-hdfc merger, होम लोन, कार लोन, icici बँकेत नोकरी, फ्रेंडशिप?" फोन कट्! ☺ (वरील प्रसंग काल्पनिक असून तो कुणासोबत खरोखर घडल्यास निव्वळ योगायोग समजावा) ☺


Part 2-

अनेकदा सांगूनही टेलिमार्केटिंगवाल्या तिने कॉल करणे चालूच ठेवले. आज मी शेवटी तिला शक्य तितक्या शांत सुरात म्हणालो, "हे बघ! तू रोज दिवसातून केव्हाही कॉल करतेस! बरोबर?" "हो सर!", ती म्हणाली. "रोज न चुकता करतेस! बरोबर?" "हो सर!" "आणि प्रत्येक कॉल बहुतेक वेगवेगळ्या नंबर वरून करतेस!", मी पुन्हा प्रश्न विचारला. "हो सर! हो हो सर!", ती उत्साहाने म्हणाली. "बरेच वेळा मी कॉल उचलत नाही. आणि एखादेवेळा उचललाच तर तुमच्या ऑफर मला नकोत असे मी दर वेळेस सांगतो की नाही?" "हो सर!" "मग आपण त्यापेक्षा असे करूया का? दिवसातील एक वेळ ठरवून ठेवूया. रोज त्यावेळेस मला आठवण ठेऊन कॉल करत जा म्हणजे मी कॉल उचलत जाणार नाही! आहे की नाही सोप्पी आयडिया!"

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा