भटक्या कुत्र्यांचा प्रश्न दिवसेंदिवस पुणे, मुंबईत गंभीर होत चालला आहे. अर्थातच इतर शहरात सुद्धा असेलच. दिवसा सुद्धा आणि विशेषकरून रात्री अंधार पडल्यावर या भटक्या कुत्र्यांचे साम्राज्य सुरू होते. त्यांच्या रात्री च्या मोठमोठ्याने ओरडण्याने झोपमोड सुद्धा होते.

लहान-थोर सगळ्यांनाच या भटक्या कुत्र्यांपासून त्रास होत असतो. रात्री दुचाकी वाहनांमागे पळत असल्याने वाहनांचे अपघात होऊन दुचाकीस्वाराचा मृत्यू होण्याचा संभव असतो. पायी चालणाऱ्या सर्वांनाच कुत्र्यांचा त्रास होतो. कुत्रा चावून लचका तोडून व्यक्तीला मरण ओढावू शकते. कुत्र्यांमुळे इकडे तिकडे घाणीचे साम्राज्य होते.

काही कथित प्राणीप्रेमी संघटना या कुत्रांवर काही बंदोबस्त करायला का नाही म्हणतात हे आकलनापलिकडचे आहे. त्यांना मारणे उचित नसेल तर प्राणीप्रेमी मंडळींनी सरकारी किंवा संघटनेच्या किंवा स्वत:च्या पैशातून त्या कुत्र्यांसाठी एक घर/संग्रहालय बनवून त्यात त्यांना पोसावे आणि २४ तास सोसावे. नसबंदी वगैरे करून त्यांची पैदास नियंत्रीत करण्याचे मागे कुठेतरी वाचले ते प्रत्यक्ष होते की नाही देव जाणे! प्राणीप्रेमी, श्वानप्रेमी मंडळींनी एकदा तरी रात्री गल्लीतून एकटे जावून दाखवावे. म्हणजे या गोष्टींची तीव्रता व त्रास त्यांना समजेल. एकदा तरी त्यांना(सुद्धा) एक तरी कुत्रा कडकडून चावावा, अशी माझासारख्या असंख्य श्वानत्रस्त व्यक्तींची मनापासून इच्छा आहे.

तसेच पाळीव कुत्र्यांना सकाळी फिरायला घेवून येणारी श्वानप्रेमी (कुत्राप्रेमी म्हणू नका बरं! ते चिडतील! ) मंडळी रस्त्यावरच्या इतर जाणाऱ्या येणाऱ्या मंडळीचे बिनधास्त चालणे मुष्कील करून टाकतात. तसेच ही श्वानप्रेमी मंडळी इकडे तिकडे श्वान-विष्टा पसरवून निघून जातात. त्यांना प्रेम असेल कुत्र्यांबाबत, पण ते घरी राहूद्या! इतर सार्वजनीक ठिकाणी ते इतरांना दाखवण्याची आवश्यकता नाही. एवढे बरे की, काही ठीकाणी बागेत श्वान आणण्यास बंदी आहे. नाहीतर सकाळचा व्यायाम, जॉगींग सुद्धा भीत भीत करण्याची पाळी येईल.

याबाबत काय करता येईल?
पालीका/सरकार या प्राणीप्रेमी मंडळींच्या दबावाखाली एवढं का झुकतं?
ह्या श्वानप्रेमी/प्राणीप्रेमी संघटना या कुत्र्यांची जबाबदारी का घेत नाही?
याबाबत कुठे तक्रार करायची?
अनेकदा ओरड होउनही भटक्या कुत्र्यांसंदर्भात पालीका/सरकार ठोस पावले उचलून निर्णय का घेत नाही?

प्रशिक्षीत कुत्रे घराची राखण करतात, पोलीसांत त्याचा उपयोग होतो, ही एक वेगळी गोष्ट झाली, पण म्हणून त्यांना सामान्य माणसांना चावून मारून टाकण्याची परवानगी द्यावी, असे नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा