रिंगटोन्सबद्दल माझ्याजवळ असलेली काही उपयुक्त माहिती व टीप्स सगळ्यांना माहिती व्हाव्यात व आणखी काही माहितीची देवाण घेवाण एकमेकांत करता यावी यासाठी हा चर्चेचा प्रस्ताव.
आजकाल प्रत्येकाजवळ मोबाईल असतो. ज्यांचेजवळ साधा मोबाईल असतो (ज्यात फक्त साधे रिंगटोन्सच वाजू शकतात)त्यांच्या प्रत्येक रिंगटोन्साचा आवाज / टोन / पीच हा जवळपास सारखाच असतो. उदाहरणार्थ- नोकिया ११००.
पण ज्यांचेजवळ 'एमपी थ्री' रिंगटोन्स ची सोय आहे, त्यांच्यासाठी खालील उपयुक्त माहिती/शिफारस देत आहे-

जर साधे संगीत/गाणे असलेला रिंगटोन आपण लावला तर बाहेर गर्दीत तो ऐकू येत नाही. व्हायब्रेशन जरी असले तरी काही वेळा बॅगमध्ये किंवा इतरत्र मोबाईल असल्यास व्हायब्रेशन न जाणवण्याची शक्यता असते. यावर एक साधा उपाय आहे.
आपणांस माहिती असेल की बासरी किंवा शिटी चा टोन/पीच जास्त असतो कारण त्यांची फ्रिक्वेन्सी (वारंवारिता) जास्त हर्टझ असते व ऐकायलाही ते मधूर असतात. या साध्या तत्त्वाचा वापर करून आपण जर खालीलप्रमाणे केले तर ते फायदेशीर ठरते.
गूगल वर जावून 'एमपी थ्री कटर/क्लीपर' नावाचा प्रोग्राम सर्च करा.
सर्च झालेल्यापैकी काही फ्रीवेअर असतील ते डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
मग आपल्या आवडीचे 'एमपी थ्री' गाणे ज्यात शिटी किंवा बासरी असेल त्या गाण्यातील शिटीचा/बासरीचा तेवढा भाग कट करा. तो नंतर आपल्या मोबाईलमध्ये कॉपी करा आणि रिंगटोन म्हणून सेट करा.
आवाज मोठा असला तरी त्याचा त्रास होत नाही आणि खुप दूरपर्यंत आवाज ऐकूही येतो.
'कूल एडीट' नावाचा प्रोग्राम असेल तर त्यावर व्हॉल्यूम वाढवताही येतो व गाण्यात इको, नॉईस रिडक्शन असे काही खास वैशिष्ट्येही वापरता यतात.
काही प्रसिद्ध गाणे ज्यत शीटी आणि बासरी आहे.


शिटी :

ए मेरे हमसफर -बाजीगर
चोरी चोरी जब नजरे मिली -करीब
चांद सिफारिश - फना
किसका है ये तुमको - मै हूं ना
सपने मे मिलती है - सत्या
छोड आये हम - माचीस
प्यार तो होना ही था - शिर्षक गीत
धूम अगेन - धूम टूबासरी :


निंदिया से जागी - हिरो
तनहा तनहा - रंगीला
मेरी तरह तुम भी कभी - क्या यही प्यार है
इधर चला मै उधर चला - कोई मिल गया
काय मग, करून बघणार ना हा प्रयोग?
इतर हिंदी व मराठी गाण्यांत असलेली शिटी/बासरी कुणाला आठवली तर ती येथे सांगावी. एक अनोखा संग्रह होईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा