--पुण्याच्या पीएमपी बसेस मध्ये डावीकडची पूर्ण बाजू स्त्रियांसाठी रविवार वगळता आठवडाभर राखीव असते, असा "स्त्री-पुरुष" समानतेच्या काळातही कायदा आहे.

(स्त्री-पुरुष समानता पण हवी आहे, आणि प्रत्येक ठीकाणी आरक्षण सुद्धा)

पण याचा नेहेमी स्त्रीयांकडून गैरफायदा घेतला जातो तो असा-

(१) समजा डावीकडील सीट रिकामी आहे, आणि तरीही स्त्री उजवीकडच्या रिकाम्या सीटवर बसते, तर हा सुद्धा हा कायदा टोडण्याचाच प्रकार आहे. कारण, डावीकडची सीट रिकामी असल्यावर सुद्धा मुद्दाम मुली/स्त्रीया/आडदांड बाया, उजवीकडेच बसतात. थोडे काही म्हटले तर उगाच सगळ्या प्रवाशांचा रोष पत्करण्याची भीती. कारण बहुतेक कायदे पुन्हा स्त्रीकडून. म्हणजे पुरुषांची हकाची एक सीट जाते.

-- डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे स्त्रीयांनी बसले पाहिजे.

(उजवीकडे बसू नका असे आम्ही म्हणू ही शकत नाही, कारण, त्यांचे उत्तर तयार असते- "उजवीकडे, पुरुषांसाठी राखीव असे थोडेच लिहिले आहे?")

(२) बसमध्ये पुरुष उभे असताना, पैसे खिशातून काढत असतांना वगैरे अगदी चुकून धक्का एखाद्या स्त्रीला लागला तरी त्या अशा काही नजरेने बघतात की बापरे. विशेष म्हणजे बसमधल्या प्रत्येक मुलीला/ स्त्रीला असे (गैरसमजापोटी) वाटत असते की तीच फक्त जगातील सर्वात सुंदर स्त्री आहे, आणि जणू काही बसमधले सगळे (सगळ्या वयाचे) पुरुष/ मुलगे फक्त तिलाच बघत आहेत.

-- बसमध्ये उभे असतांना कुणीही मुद्दाम धक्के देत नाही. बसमध्ये पुरुषांना हे टाळण्यासाठी अगदी चोरून उभे राहावे लागते.

(३) रविवारी कामाचा दिवस नसला तरी सुद्धा डावीकडच्या जागेसाठी स्त्रीया कंडक्टरकडे भांडत बसतात.

" डावीकडील पूर्ण सीटस भरलेली असतील तरच उजवीकडे रिकामी जागा असल्यास स्त्रीयांनी बसले पाहिजे."

अशी सूचना बसमध्ये लावली गेली पाहिजे.

नाहीतर, "उजवीकडील पूर्ण रांग पुरुषांसाठी राखीव करावा लागेल."

सर्व पुणेरी मंडळींना काय वाटते?

इतर शहरातील मंडळींनी सुद्धा मत व्यक्त करायला हरकत नाही.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा