कोणत्याही चित्रपटाचे किंवा जाहिरातीचे वर्तमानपत्रातील छापील पोस्टर किंवा चित्रपटगृहावर लावलेले पोस्टर असो, एक गोष्ट निरिक्षण करून माझ्या लक्षात आली आहे ती म्हणजे जेव्हा पोस्टरवर मुख्य अभिनेता आणि अभिनेत्री ठळकपणे असतात, तेव्हा नेहेमी अभिनेता (हिरो) हा अभिनेत्रीच्या (हिरोईनच्या) उजवीकडेच असतो.उदाहरणादाखल दिलेल्या चित्रपटांची पोस्टर्स पेपरमध्ये बघा: थोडा प्यार थोडा मॅजिक, लव्ह स्टोरी २०५०, कहो ना प्यार है, दे ताली

असे का असते? की येथेही (कळत किंवा नकळत) पुरुष हा स्त्रीपेक्षा उजवा (श्रेष्ठ) आहे असे दाखवायचा प्रयत्न (योग्य की अयोग्य तसेच कोण श्रेष्ठ ही चर्चा येथे अपेक्षीत नाही ) असतो?

पोस्टरवर चार पाच अभिनेते जरी असले तरी बहुतेक करून उजेवीकडून पहिला पुरुषच असतो. (दे ताली) एखाद्या कार्टून स्ट्रीप मध्ये ही बहुतेक वेळा असेच असते. काय असेल या मागची मानसिकता? आपल्याला ही निरिक्षणातून असेच काहिसे आढळले आहे का? की आणखी वेगळे? की माझे निरिक्षण चुकते आहे?

आपणांस काय वाटते? वेगवेगळ्या चित्रपटांची (मराठी, हिंदी, इंग्लीश) पोस्टर्स बघून आपण आपले अनुभव येथे मांडू या. एक वेगळा विरंगुळा होईल आणि एखादा निष्कर्षही निघेल. बहुमताने!
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा