वाहिन्यांवर (खासगी आणि दूरदर्शन) दाखवले जाणारे चित्रपट कापलेले असतात. त्याचे कारण नक्की माहिती नाही.(म्हणजे मूळ चित्रपटातला बराचसा भाग कापलेला असतो. चित्रपट आधी बघितला असला तर नीट लक्षात येईल ते!)

असे जरुरी नाही की तो भाग "प्रौढांसाठी "(हिंसा आणि अश्लीलता ) आहे म्हणून कापला आहे, तर बरेचदा चित्रपटाचा चांगला असणारा भाग, प्रसंग, गाणे सुद्धा कापलेले असते. मग असा चित्रपट बघणे म्हणजे काहितरी चुकल्यासारखे वाटते.
आधीच भरमसाठ जाहिरातींचा मारा आणि त्यात अपूर्ण चित्रपट दाखवणार असतील तर बघण्यातली मजा निघून जाते.
एकदा मी दूरदर्शनवर रात्री साडेनऊ वाजता "बाजीगर" बघितला. त्यात, शाहरुख शील्पा शेट्टीला इमारतीवरून फेकतो हा भाग पूर्णपणे कापला होता. तो शिल्पाला गच्चीवर घेवून गेला आणि त्यानंतर तो डायरेक्ट इमारतीखालच्या पोष्टाच्या पेटीत पत्र टाकत होता. म्हणजे प्रथम बघणार्‍याला काहीच समजणार नाही. समजा हिंसा आहे म्हणून हि दृश्ये कापली असे गृहीत धरले तर त्याच चित्रपटाच्या शेवटी शाहरूख दिलिप ताहील एकमेकांच्या पोटात सळई घालतात ते मात्र कापले नव्हते आणि चित्रपटाच्या मध्ये येणार्‍या ब्रेकमध्ये तर चित्रपटापेक्षा जास्त अंगप्रदर्शन / हिंसा असते. मग चित्रपट कापण्यात अर्थ काय राहिला?

बरेचदा याउलट (पण क्वचित) असा अनुभव ही आला की सेट मॅक्स वर एकदा "कयामत" या चित्रपटातले "लांबी कमी करण्यासाठि सिनेमागृहात प्रदर्शीत न झालेले दृश्य (साधेच) " सुद्धा दाखवले होते. त्यात सुनिल शेट्टीच्या काही मारामार्‍यांचा अंतर्भाव होता.

वाहिन्यांवर चित्रपट जरूर दाखवा.
पैसे वाचतात. पण अपूर्ण नको असे या वाहिन्यांना सांगावेसे वाटते.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा