अक्सर-जिंदा-डार्लिंग-मर्डर हे चारही हिंदी चित्रपट हिंसा आणि विवाहबाह्य संबंधांचे काहीसे समर्थन करणारे!

वरील यादीत आणखी काही नावे टाकता येतील - काँटे, प्लान, बूम, चॉकलेट वगैरे.

असे चित्रपट निघाल्यापासून एक विचार मनात येतो आहे की, एक तर असे चित्रपट मुख्य प्रवाहत नकोत, म्हणजे प्रथितयश कलाकारांना घेवून काढण्या ऐवजी सी ग्रेड कलाकारांना घेवून काढावेत आणि ते मॉर्निंग शो म्हणून रिलीज करावेत. पण दुर्दैवाची गोष्ट अशी की हे घडत नाही. पण आज मॉर्निंग-मॅटिनी-ईव्हिनिंग-नाईट शो मध्ये काहीच फरक राहीला नाही. जे विषय मॉर्निंग ला शोभतील ते मॅटिनी, ईव्हिनिंग ला येत आहेत.

दुसरा विचार असा की, आता वेळ आली आहे, चित्रपटाच्या कथा सूत्रा वर आणि पुर्ण कथेवरच वेगळे सेन्सॉर नेमण्याची!

नुकताच रिलीज झालेला डार्लिंग हा चित्रपट! त्यात फरदीन खान हा नवरा असतो. नुसता नवरा नव्हे तर क्षणो क्षणी खोटा बोलणारा, खोटे बोलून बोलून आपले विवाह बाह्या संबंध बायको पासून लपवणारा! त्याची प्रेयसी प्रेग्नंट असल्याचे कळाल्यावर, तीचा खून करून तीला गाडून टाकणारा व या कृत्याचा काहीएक पश्चाताप न होता, पुन्हा ते लपवण्यासाठी निखालास खोटे बोलणारा. प्रेयसी भूत बनून त्याला छळते, तरीही , हा निगरगट्ट तीला ही फसवत राहातो. शेवटी एकदा त्याची पत्नी अपघातात जखमी होवून हॉस्पिटल मध्ये असते तेव्हा त्याची भूत-प्रेयसी येते तेव्हा तो निर्लज्जपणे तीच्याजवळ कबूल करतो की मला तुम्ही दोघी हव्या होतात. तुला मला मारायचे नव्हते. पत्नी ला घटस्फोट न देता आयुष्यभर तुम्ही दोघी मला हव्या होतात. मग बायको मरते आणि ही भूतीण तीच्यात शिरते.... वाह रे वा कथा!

पुर्वी ही अशा प्रकारचे चित्रपट निघायचे पण कमीत कमी त्यात शेवटी वाईटावर चागल्याचा विजय झालेला तरी दाखवायचे. आता तर ती सोय ही राहीली नाही.

अक्सर मध्ये सुद्धा सुरुवातीपासून प्लॅन करून दिनो मोरिया शेवटी बायको ला फसवतोच.

मर्डर सुद्धा थोड्याफार फरकाने याच माळेतला.

जिंदा आणि जॉनी गद्दार हिंसेला प्रोत्साहन देणारे. हिंसेचे विविध प्रकार दाखवणारे. हिंसा करूनही त्याचा काहीएक पश्चताप न होवून वावरणारी माणसे दाखवणारे!!

"तुम्हाला आवडत नाही तर असे चित्रपट तुम्ही बघता कशाला सोनार साहेब!" अशा प्रकारची प्रतिक्रिया देवून या चर्चेचे महत्त्व कमी न करता, सगळ्यांनी या चर्चेत मनापासून भाग घ्यावासे वाटते. खरोखरच कथासुत्रावर सेन्सॉर लावण्याची वेळ आलेली आहे का? "फ्रीडम ऑफ एक्स्प्रेशन" जरी असले तरी काहीही एक्स्प्रेस करून कसे चालेल?
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा