चित्रपट समीक्षा - क्रिश ३
दर्जा- * * *
चित्रपटाचा प्रकार - वैज्ञानिक कल्पना, फॅण्टसी आणि ऍक्शन
कलाकार -
निवेदकाचा आवाज - अमिताभ बच्चन
क्रिश आणि रोहित मेहेरा - हृतिक रोशन
प्रिया - प्रियांका चोप्रा
काया - कंगना राणावत
काल - विवेक ऑबेरॉय
सुरुवातीला थोडक्यात कथा पाहू :
हा खऱ्या अर्थाने सिक्वेल आहे. मागच्या दोन्ही चित्रपटांची (कोई मिल गया, क्रिश) कथा यात खरोखर पुढे सरकते. क्रिश ३ ची कथा क्रिश प्रमाणेच खूप किचकट आहे.
रोहित मेहेरा हे त्यांचा मुलगा क्रिश आणि क्रिश ची पत्नी प्रिया सोबत राहत असतात. ते सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेवर एक प्रयोग करत असतात.
पण सुरुवातीला तो प्रयोग ऊर्जा आवश्यकतेपेक्षा जास्त झाल्याने अयशस्वी होतो. दरम्यान क्रिश भारतात अनेक ठिकाणी संकट आले असल्यास मदतीला जात असतो.
काल नावाचा एक शास्त्रज्ञ असतो. त्याला लहानपणापासूनच टेलिकायनेसीस चे वरदान मिळाले असते (ते का मिळाले असते ते नंतर शेवटी आपल्याला कळते आणि त्याला ही कळते. त्याच्या वडिलानंही ते माहिती नसते)
तो अपंग असून व्हीलचेअर वर बसल्या बसल्या अनेक गोष्टी इकडच्या तिकडे करू शकतो.
त्याने अनेक मानवर (मानव + जानवर) प्रयोगशाळेत बनवले आहेत आणि स्वत:ला ठीक करण्यासाठी तो अनेक प्रयोग करत असतो.
त्यासाठी लागणारा पैसा तो एका रोगाचे विषाणू बनवून नामिबिया, भारत अशा देशांत मार्फत पसरवून लोकांना आजारी पाडून, त्याचा इलाज करण्यासाठी स्वतःच्या रक्ता पासून ऍंटीडोट बनवून ते विकून मिळवतो.
पण इकडे रोहीत स्वतः वर आणि क्रिश वर त्या विषाणू चा परिणाम न झाल्याने क्रिश च्या रक्तापासून ऍंटीडोट बनवण्यास सफल होतात आणि तिकडे काल ला धक्का बसतो की हे कसे शक्य आहे? त्याच्या रक्ताविना इतर रक्तापासून हे ऍंटीडोट बनवणे कसे शक्य झाले? त्या अनुषंगाने रोहीत ला (सिंगापूरला जाऊन) एक सत्य कळते... ते काय असते? पडद्यावरच बघणे योग्य!
रोहित सिंगापूरला जाणार आहे हे क्रिशला घरात असून सुद्धा माहिती नसते आणि त्याचे कारण प्रिया असते असे रोहितला दिसते पण तसे नसते...
काल च्या अनेक मानवरांपैकी (मान्यवर नाही बरे!) एक मादक मानवर स्त्री काया ही सरड्याचे गुणधर्म असलेली मानवर असते. ती कोणाचेही रंग रूप घेऊ शकते. "काल" च्या पयोगशाळेत जे चालते त्याचा भांडाफोड करण्यास निघालेल्या एका व्यक्तीला ती रूप बदलवून धोक्याने मारते.
क्रिश आणि त्याच्या पूर्ण कुटुंबावर हे मानवर एके दिवशी हल्ला करतात.... त्यात प्रिया जखमी होते....क्रिश त्यांचेशी लढतो,
नंतर डॉक्टर क्रिश ला सांगतात की प्रिया च्या पोटात त्याचे वाढणारे बाळ हल्ल्यात मृत्यू पावले आहे.....
पुढे काय होते? पडद्यावर बघा!
परिक्षण :
सुरुवातीचा विमानातल्या प्रवाशांना वाचवण्याचा प्रसंग अगदी अस्सल आणि नवीन! ज्याने कुणी हि शक्कल लढवली त्याला शाबासकी!!
मानवर रात्री क्रिश कुटुंबावर हल्ला करतात तेव्हाची ऍक्शन अगदी वेगळी. वर्णन करण्यापेक्षा मी म्हणेन ती पडद्यावर अनुभवा!
ऍक्शन आणि स्पेशल इफेक्ट हॉलिवूडच्या तोडीचे आहेत. त्याबद्दल १०० मार्क. आणि विशेष म्हणजे स्पायडर, सुपर, एक्स अशा अनेक मॅन पेक्षा क्रिश आपले करामतीतले आणि ऍक्शन मधले वेगळेपण टिकवून ठेवतो. त्यात कुणाचीही नक्कल नाही.
चित्रपटाची कथा अस्सल आहे. फक्त "काल" चे शेवटचे दृश्य आयर्न मॅन ३ सारखे वाटते पण ते तरीही वेगळे आहे कारण त्याचा शरीराला चिकटणारे पत्रे टेलिकायनेसिस मुळे चिकटतात. आयर्न मॅन ची संकल्पना वेगळी आहे
कथेचे थोडेफार स्पायडर मॅन ३ शी साधर्म्य वाटते पण नंतर कळते की हे वेगळेच आहे.
यात चित्रपटात अनेक वैज्ञानिक कल्पना एकाच वेळी हाताळल्या गेल्या आहेत. (विषाणू तयार करणे, टेलिकायनेसीस, प्राणी मानव बनवणे, सूर्यापासून मिळणाऱ्या ऊर्जेचा वापर करून वनस्पतींना जिवंत करणे)
"दिल तूही बता" हे गाणे श्रवणीय आणि प्रेक्षणीय (गाण्यातले लोकेशन्स बघण्यालायक आणि गाण्यातली कंगना अतिशय मादक दिसली आहे) तसेच "रघुपती राघव" या गाण्यात हृतिकचा नाच छान आहे.
पूर्ण चित्रपटात कंगना खूप सुंदर आणि मादक दिसली आहे. सुपर वूमन च्या चपळाईला साजेसे तिचे शरीर असल्याने ती भूमिका तिला फिट बसते. दिपिकाला (पडूकोण) ही ही भूमिका करता आली असती.
कायाच्या भूमिकेतली कंगना ची वेशभूषा थोडी कॅटवूमन सारखी वाटते पण कॅटवूमन ची भूमीका करणाऱ्या "हॅले बेरी " इतकी कंगनाची फिगर मात्र सुडौल वाटत नाही.
जीभ लांब करणारा मानवर आणि काया वगळता इतर मानवरांचा म्हणावा तसा उपयोग कथेत करता आला नाही. शेवटच्या प्रसंगात फक्त काल शीच लढाई दाखवण्यापेक्षा हे सगळे मानवर सुद्धा त्यात दाखवायला पाहिजे होते. तसे राकेश रोशनने टाळले असावे कारण कदाचित मग तो स्पायडरमॅन ३ चा क्लायमॅक्स वाटला असता, ज्यात सगळे खलनायक एकत्र येतात.
क्लायमॅक्स थोडासा ट्रान्स्फॉर्मर्स ३ च्या एका ऍक्शन सीन सारखा वाटतो.
"क्रिशच्या आजूबाजूला अनेक मानवर" असे चित्रपटाचे एक पोस्टर बघून चित्रपटाबद्दल एक जी कल्पना आणि उत्सुकता तयार होते ती या चित्रपटात पूर्ण होत नाही.
राजपाल यादव चा रोल विनोदासाठी थोडा अधिक करता आला असता.
हृतिकचा अभिनय (तिन्ही भूमिकांमधला) अतिशय उत्तम.
क्रिश चित्रपटासारखा सिद्धांत आर्य च्या प्रयोगशाळेत जसा क्लायमॅक्स होतो तसा आता क्रिश ३ याही चित्रपटाचा क्लायमॅक्स "काल" च्या प्रयोगशाळेत होणार आणि चित्रपट एवढ्यात संपणार की काय असे वाईट वाटत असतांना काल तेथून पसार होतो, आणि आपल्याला अजून क्लायमॅक्स बाकी आहे असे समजून हायसे वाटते.
एकूण राकेश रोशनचा एक अतिशय चांगला सफल प्रयत्न असे या चित्रपटाबाबत म्हणता येईल.
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा