(अनुवादित कथा)
सोर्गि हा देशभक्त गुप्तहेर होता. केवळ पैसे आणि वलय यासाठी तो या क्षेत्रात आला नाही. तो देशभक्त होता आणि त्याची इच्छा नाझींचे निर्दालन करून रशियाला आणि जगाला त्यांच्यापासून वाचवणे ही होती. त्याने हे प्रत्यक्षात आणले ते अशी एक माहिती रशियाला पुरवून की जी हिटलर ची सद्दी संपवायला पुरेशी ठरली.  

जागतिक दुसरे महायुद्ध अगदी जोरात होते त्यावेळची ही गोष्ट. जपान आणि इटली चा मदतीने जर्मनी नवनव्या आघाड्यांवर विजयी ठरत होते. फक्त एक चिंता होती - स्टॅलिनग्राड अजून त्यांच्या हाती लागत नव्हते. त्यावर त्यांचा डोळा होता. दरम्यान स्टॅलिन ला एक खबर मिळाली की जपान रशिया वर आक्रमण करणार नाही कारण थायलंड आणि मलया जिंकण्यासाठी त्यांना तीन लाख सैनिक लागणार होते. ही एक चांगली बातमी होती. त्याने आपले सगळे सैनिक इतर आघाड्यांवरून काढून घेतले आणि स्टॅलिनग्राड मध्ये ठेवले. त्यानंतर तेच हिटलरच्या अध:पतनास कारणीभूत ठरले. ही माहिती पुरवणारा दुसरा तिसरा कोणी नसून डॉ.रिचर्ड सोर्गि होता. 

डॉ.रिचर्ड सोर्गि हा एक एकमेवाद्वितीय असा गुप्तहेर होता. तो रशियातील वाकू येथे जन्माला होता. त्याची आई रशियन तर वडील जर्मन होते. जर्मनीत तो एक पत्रकार बनला आणि अनेक भाषा तो अस्खलित बोलू शकत होता. तो उंच आणि देखणा होता. त्याची दूरदृष्टी आणि साम्यवादावरचा विश्वास त्याला रशियाचा गुप्तहेर बनवण्यास कारणीभूत ठरला. 

जपान पर्ल हार्बर वर हल्ला करणार ही बातमी सांगणारा स्टॅलिन ला सांगणारा सोर्गि हा प्रथम व्यक्ती होता. या बातमीमुळेच रशियाने आपली युद्धनीती बदलवली आणि अमेरिका या युद्धात उतरली. सोर्गिची सुरुवातीची शाळा होती बर्लिनमध्ये. त्याचे काका आल्फ्रेड सोर्गि हे कार्ल मार्क्स चे सेक्रेटरी होते. सोर्गि वर त्याच्या काकांचा खूप प्रभाव होता . सोर्गि न पहिल्या जागतिक महायुद्धात सैनिक म्हणून भाग घेतला होता आणि तो दोनदा जखमी झाला होता. हॉस्पिटलमध्ये असताना १९२० साली बर्लिन विद्यापीठातून त्याने राज्यशास्त्रात पदवी मिळवली. त्यानंतर त्याने शिक्षकी पेशा पत्करला. पण लवकरच त्याचा राजीनामा देऊन त्याने कोळशाच्या खाणीत काम स्वीकारले. त्यानंतर 1922 मध्ये त्याने वर्तमानपत्रांत लिखाण सुरू केले. तोपर्यंत त्याला पाच भाषा अवगत झालेल्या होत्या - फ्रेंच, रशियन, चिनी, जपानी, जर्मन! 

हळूहळू त्याचे आवडीचे क्षेत्र बदलत गेलेत. साम्यवादी पक्षात तो ओढला गेला. 1927 पर्यंत तो गुप्तहेर बनला  होता. फक्त आपली ओळख लपवण्यासाठी तो जर्मन पत्रकार बनून लिहीत राहिला. 1930 मध्ये त्याला चीन मध्ये पाठवण्यात आले. तेथेच त्याला अनेक कामे करण्याची  खऱ्या अर्थाने संधी मिळाली. शांघाय ला त्याने आपले एक कार्यालय उघडले आणि होवांग हो, मनामकिंग, कनटेन, बीजिंग, मंचुरिया येथे भटकंती केली. त्यादरम्यान त्याने दोन मित्र बनवले एक जर्मन स्त्री पत्रकार- अग्नेस आणि जपानी पत्रकार होजुमी. त्याच्या अंतापर्यंत ही दोन्ही त्याचेशी निष्ठावान राहिली. 

1933 मध्ये त्याला नाझी पार्टीचे सभासदत्व मिळाले . ते कसे मिळाले ते आजपर्यंत कुणालाही माहिती नाही . ते एक रहस्यच आहे. 

नाझी बनल्यानंतर सोर्गि ने अमेरिकेत, कॅनडात प्रवास केला.जपानमध्ये फिरला. जपानमध्ये तो टोकियोमध्ये थांबला आणि तेथे पत्रकार बनला. टोकियोमध्ये जर्मन दूतावासात प्रवेश मिळवणे ही  त्याची तेथे  कामगिरी होती. सुरुवातीला त्याला यश मिळाले नाही. पण भाग्य सोर्गि चा बाजूने होते. त्या वेळेस नवीन जर्मन राजदूत टोकियोत आला. त्याला आशियातील राजकारण तितकेसे कळत नव्हते. त्याला एका सल्लागाराची गरज होती. सोर्गि ने त्या पदासाठी अर्ज केला आणि ते त्याला मिळाले. सोर्गि चे प्रयत्न फळाला आले.  

सोर्गि ने एक खोली डार्क रूम मध्ये रूपांतरित केली. तेथे त्याने महत्त्वाच्या कागदपत्रांचे फोटो काढले. कुणालाही सोर्गि चा संशय आला नव्हता. तो नवा राजदूतच नाही तर लष्करी अधिकारी सुद्धा त्याचा सल्ला घेऊ लागले, त्याचेवर विश्वास ठेवू लागले.  
दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सोर्गि ला जर्मन दूतावासात पत्रकार सचिव म्हणून नोकरी मिळाली. ती एक प्रतिष्ठेची नोकरी होती आणि पगारही तेवढाच प्रतिष्ठित होता. 


1940 मध्ये जपान आणि जर्मनीची युती झाल्यानंतर त्याने ही कागदपत्रे होजुमी ला पाठवली. अशी देवघेव ते प्राणिसंग्रहालय, खानावळ,बार मध्ये करत असत. त्यांच्यातले संभाषण हे नेहमी एक दुसऱ्याला सिगारेट मागण्यापासून सुरू होत असे. दुसरा त्याला सिगारेटचे पाकीट देत असे ज्यात सगळी माहिती असे. 

1935 च्या सुरुवातीला त्याने युरोप कौमिंग्टन ते न्यूयॉर्क असा प्रवास केला. नंतर त्याने सोव्हियत चा व्हिसा घेतला आणि तो 
रशियाला गेला.तेथून तो जपान ला परतला  आणि "क्लाऊझन आणि कंपनी " ही कंपनी काढली .त्यात एकट्या क्लाऊझन ची  85000 येन गुंतवणूक होती.  त्या कंपनीने प्रिटींग मशीन्स बनवण्याचा आणि विकण्याचा फायदेशीर धंदा केला . 1941 मध्ये त्या कंपनीचे नाव "जॉइण्ट स्टॉक कंपनी" असे करण्यात आले. क्लाऊझन त्याचा जवळचा बनला. सोर्गि त्याला सर्व माहिती सांगायचा.  जपानी गुप्तहेर रिस्तू ला क्लाऊझन ओळखायचा. सोर्गि पुढे अब्जाधीश बनला. हेरेगिरिसाठी लागणारे पैसे त्याला सहज उपलब्ध झाले. त्याने महत्त्वाची माहिती रशियाला पुरवली त्याने मॉस्को ला जे कळवले त्यात या गोष्टी होत्या - जर्मन आर्मी ची बित्तंबातमी, हिटलरचा मॉस्को वरचा हल्ला आणि जपानचे  रशियावर हल्ला करण्याच्या निर्णयापासून परावृत्त होणे!

युद्ध संपण्याच्या मार्गावर असताना त्याला आपल्या जिवाला असलेला धोका जाणवला. त्याला लवकरात लवकर रशियात परतायचे होते. पण त्यापूर्वीच तो पकडला गेला. पण त्याच्या चुकीमुळे नव्हे! तर जपानी गुप्तहेर रिस्तू च्या कबुलीजबाबा मुळे तो पकडला गेला. रिस्तू ने सोर्गि आणि क्लाऊझन ला धोका दिला. त्याने सर्वांची खरी ओळख कबूल केली. 
कुणालाही विश्वास बसला नाही की सोर्गि गुप्तहेर आहे . जर्मन दूत सुद्धा यावर विश्वास ठेवायला तयार नव्हता. त्याने जपानी पोलिसांवर दबाव आणून सोर्गि ला सोडण्याची मागणी केली पण काही उपयोग झाला नाही. क्लाऊझन ने कबुलीजबाब दिला आणि त्याचे पाहून सोर्गि ने पण कबुली दिली. पण त्यांनी हे ही सांगितले की त्यांनी कधीच कुणा ऑफिसर चा गैरवापर केला नाही कारण स्वतः ऑफिसर्स त्यांना गुप्त गोष्टी सांगत असत. पण त्यावर जपानी पोलिसांनी विश्वास ठेवला नाही. 
क्लाऊझन आणि सोर्गि दोघांना मृत्युदंडाची शिक्षा ठोठावली गेली. सोर्गि च्या  मृत्यू नंतर अमेरिकेने जनरल  ऑर्थर यांना सोर्गि वर रिपोर्ट बनवायला सांगितला. 

जनरल  ऑर्थर यांनी लिहिले - "सोर्गि ने स्टॅलिन ला वाचवले!" 
सोर्गि चे खरे स्वरूप सगळ्या जगाला उघड झाले पण जगभरातल्या नेत्यांना त्याबद्दल स्पष्टीकरण देण्यासाठी सोर्गि जिवंत नव्हता!

अनुवादित कथा -

पुस्तक: वर्ल्ड फ़ेमस अडव्हेंचर्स 
लेखक: अभय कुमार दुबे 
आवृत्ती: 2008
प्रकरण 21: द सिक्रेट एजंट हू सेव्ह्ड द वर्ल्ड 

अनुवाद: निमिष न. सोनार, धानोरी, पुणे 
आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा