शतशब्द कथा म्हणजे फक्त शंभर शब्दांत कथा लिहायची.  ही कथा मिसळपाव डॉट कॉम ने ऑगस्ट २०१५ मध्ये आयोजित केलेल्या जागतिक शतशब्द कथास्पर्धेत ६ वी आली होती. माझी ही कथा जागतिक स्तरावर एकूण 3446 जणांनी वाचली. स्पर्धेतला सहावा नंबर हा वाचकांच्या पसंती नुसार निवडण्यात आला होता. साल १९७०. पाक्षिक कार्यालय.
“तुझी कथा एकदम भंगार आहे. तू दहा वेळा बदल केलास तरी त्यात जीव येत नाही!” संतापलेले संपादक माधव अनुबंधला म्हणाले.
त्याच्या डोळ्यातून मागच्या वेळेपेक्षाही जास्त दु:खाने जडावलेला अश्रू तरळला.
“पुन्हा येऊ नकोस. तू लेखन बंदच केलेले बरे!”
त्यांनी कथा न फाडता कचरापेटीत भिरकावली.
“माझे ऐका. ही कथा वाचकांना नक्की आवडेल!” अनुबंध रडत म्हणाला.
“मी दहा वेळा तुला येऊ दिले. दुसऱ्या कुणी तुला तिसऱ्या वेळाच हाकलून लावले असते. निघा आता!”
भोळ्या अनुबंधने लेखनविचार सोडला. कायमचा!
एका वर्षानंतर चणे खातांना कागदावर त्याने प्रथम पुरस्कार विजेती कथा वाचली -
त्याचीच कथा, संकल्पना! पात्र, स्थळ बदल! लेखक माधव. चणे घशाखाली जाईनात!

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to वाचनस्तु


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
सापळा
झोंबडी पूल
श्यामची आई
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
कथा: निर्णय
रत्नमहाल
शिवाजी सावंत
लोकभ्रमाच्या दंतकथा
बाधा