स्वामीजी उभे राहिले. त्यांचें मन भरून आलें होतें. ते म्हणाले, “मला जगात एकच बंधन तोडता येत नाहीं व ते म्हणजे मुलांचें. मी इतर सर्वांच्या इच्छा धुडकावून लावतों, परंतु मुलांची इच्छा मी भंगूं शकत नाही. आज गोपाळरावांबरोबर दोन ही मुलें न येतीं तर मी येथे आलों असतों कीं नाही याची मला शंका वाटते. मुलांनी मला येथे खेंचून आणलें आहे. उंच पर्वत इकडे तिकडे भटकणा-या मेघांना ओढून घेतात,  प्रचंड जंगले मेघांना ओढून घेतात. त्याप्रमाणे इतस्तत: भटकणा-या मला, तुमच्या प्रमेळ व थोर हृदयांनी ओढून घेतलें आहे. तुमच्यांत राहावयास मी उत्सुक आहे. आपला हा सहवास एकमेकांस उत्साप्रद, बलप्रद व स्फूर्तिप्रद होवो. आजपासून मी मुलांचा होत आहे. मुलें म्हणजे माझे देव,” असे म्हणून स्वामी खाली बसले.

गोपाळराव स्वामींना म्हणाले, “ एखादी प्रार्थना म्हणा. नवीन संसाराला प्रार्थनेंनें आरंभ होऊ दे.”

“संन्याशाचा संसार,” स्वामी म्हणाले.

मुले हंसली.

“ एखादा अभंग म्हणा,” गोपाळराव म्हणाले.

“ काहींहि म्हणा,” मुले म्हणाली.

“ देवांची आज्ञा झाली. आतां म्हणतो,” असें म्हणून स्वामी गुणगुणू लागले. पद सुरु झालें. भावनामय गाणें सुरु झाले. स्वामींचा गोड व मीठा आवाज त्या प्रार्थनामंदिरांत भरून राहिला.

मुलें म्हणजे देव
मुलें म्हणजे देव
मुलें म्हणजे राष्ट्राची मोलाची ही ठेव || मुलें.||
त्यांना देई सारे कांही
त्यांनी चिंता सदा वाही
त्यांना आधी पोटभर मागून तूं रे जेव || मुलें.||
हंसव त्यांना खेळव त्यांना
फुलव त्यांना खुलव त्यांना
आनंदाच्या विकासाच्या वातावरणी ठेव ||मुलें.||
भविष्याचे कोमळ मोड
भविष्याच्या कळ्या गोड
भविष्याचे विधाते हे भक्तिभावे सेव ||मुलें.||

गाणें म्हणून स्वामी एकदम निघून गेले. गोपाळरावहि न बोलता उठले. मुलेंहि शांतपणे क्षणभर बसली व मग उठली. ‘मुलें म्हणजे देव, मुलें म्हणजे देव’ हेंच चरण वातावरणांत भरुन राहिले.

आपण साहित्यिक आहात ? कृपया आपले साहित्य authors@bookstruckapp ह्या पत्त्यावर पाठवा किंवा इथे signup करून स्वतः प्रकाशित करा. अतिशय सोपे आहे.
Please join our telegram group for more such stories and updates.telegram channel

Books related to धडपडणारी मुले


चिमणरावांचे चर्हाट
सुधा मुर्ती यांची पुस्तके
नलदमयंती
श्यामची आई
गावांतल्या गजाली
झोंबडी पूल
सापळा
अश्वमेध- एक काल्पनिक रम्यकथा
गांवाकडच्या गोष्टी
खुनाची वेळ
पैलतीराच्या गोष्टी
भारताची महान'राज'रत्ने
गरुड पुराण- सफल होण्याचे उपाय
कथा: निर्णय
रत्नमहाल